"दर्शन गोल्ड चा" शुक्रवारी स्थलांतरित जागेत होणार भव्य शुभारंभ....! विशाल वर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती....!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 18, 2023

"दर्शन गोल्ड चा" शुक्रवारी स्थलांतरित जागेत होणार भव्य शुभारंभ....! विशाल वर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती....!!

 "दर्शन गोल्ड चा"  शुक्रवारी स्थलांतरित जागेत होणार भव्य  शुभारंभ....! 

विशाल वर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती....!! 

सोलापूर( कटू सत्य वृत्त): -सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये उत्तम आणि चांगल्या दर्जाचे सोने आणि चांदी ग्राहकांपर्यंत पोहोचविणाऱ्या दर्शन गोल्ड या सोने व चांदी स्वरूपात विकणाऱ्या फर्मचा स्थलांतरित जागेत भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती विशाल वर्मा यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना वर्मा म्हणाले की, " चाटी गल्लीच्या पाठीमागील लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील राज मंगल प्राईड या नूतन वास्तूमध्ये दर्शन गोल्ड चे स्थलांतर होत आहे. आपल्या असंख्य ग्राहकांना या कार्यक्रमाची माहिती व्हावी,  म्हणूनच आपण ही माहिती प्रसिद्ध करत आहोत . पीपी पटेल आणि कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर जयेश पटेल आणि सोलापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष गिरीश देवर मणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 

यावेळी वर्मा यांच्या मातोश्री श्रीमती मंगलादेवी वर्मा यांच्या हस्ते वेबसाईटचे आणि ॲपचे शुभारंभ सुद्धा होणार असल्याची माहिती यावेळी विशाल वर्मा यांनी दिली. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची बिस्किटे आम्ही विकतो, त्याचप्रमाणे शुद्ध चांदी देखील विकत असल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले. सोन्यामधील गुंतवणूक म्हणजे इमर्जन्सी लिक्विडिटी आणि चांगला फायदा देणारी गुंतवणूक या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं जातं. कारण सोन्याचे भाव सातत्याने वाढतच असतात. क्वचित कधीतरी महामारी किंवा आणीबाणीच्या काळात  थोडेसे भाव घसरू शकतात. 2021 मध्ये कोरोना काळात सोन्याच्या भावात करेक्शन झाल्यामुळे भाव कमी झाले होते. परंतु तरीही दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक म्हणून आज ही सोन्याकडेच सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या आशेने पाहतात. कारण गरज पडल्यावर तातडीने आणि जगात कुठेही सहजपणे पैसे उपलब्ध करून देणारे "सोने" निश्चितच जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असते.  असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

इस्त्राईल- हमास युद्धामुळे गेल्या पंधरा दिवसात सोन्याचे भाव उसळी मारत आहेत. या युद्धामुळे सोन्याच्या भावात अवघ्या एका आठवड्यात पाच टक्के वाढ झाली आहे. काबाडकष्ट करणाऱ्या महिलेपासून कार्पोरेट इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांनाच दागिन्यांची विशेष आगळीवेगळी हौस असते. त्यामुळे काहीजण आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये अशा प्रकारची हौस पूर्ण करण्यासाठी पैशाची जमवाजमव करतात. फक्त सोने -चांदी विकण्यासाठी स्थापन झालेली दर्शन गोल्ड  ही आमची सोलापुरातील एकमेव फार्म असल्याचे वर्मा यांनी अभिमानाने सांगितले. सोने विक्रीचा व्यवसाय लग्नसराई मध्ये तीन ते चार महिने आणि दसरा ते दिवाळी अशा सणासुदीच्या कालावधीमध्ये अतिशय  वेगवान म्हणजेच फार्मात चालतो. जगभरातील विविध घटनांचा परिणाम सोन्याच्या किमतीवर सातत्याने होत असतो. त्याचबरोबर आम्ही व्यापारी सोन्याचे अथवा चांदीची बहुतांश विक्री आरटीजीएस च्या माध्यमातून अथवा रोख स्वरूपात करीत असल्याचेही यावेळी बोलताना विशाल वर्मा यांनी सांगितले. 

आम्ही बिस्किट स्वरूपात सोने देतो त्याचप्रमाणे वेळप्रसंगी ग्राहकांना त्या सोन्याचे पैसे देखील तातडीने देतो. आमचे सोन्या-चांदीचे चालु भाव आमच्या वेबसाईटवर आणि ॲपवर रोजच्या रोज दिसत असल्यामुळे ग्राहकांना घरी बसून सहजपणे चालू भाव पाहता येतो. सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये सर्वांनाच आता ऑनलाईन खरेदीची सुद्धा वेड लागले असल्याचं वर्मा यांनी बोलताना शेवटी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages