सावधान नवीन बस स्थानक असते रात्री विराणवाडा?
"इथे कायमस्वरुपी गरज आहे सुरक्षा रक्षकाची"
अकलूज (कटूसत्य वृत्त):-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने सोलापूर जिल्ह्याची मान उंचावेल असे अकलूज येथे नवीन बस स्थानक झाले.परंतु या बस स्थानकाचे दुर्दैव म्हणावे लागेल? सूर्योदयानंतर बस स्थानक स्वर्गाहून सुंदर असते तर रात्री विरान आणि भयानक वास्तव असते. यामुळे नवीन बस स्थानक परिसरात कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची गरज असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.
27 ऑक्टोंबर 1994 रोजी नवीन बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी परिपूर्ण झाले.सध्या अकलूज गावच्या मध्यभागी असणारे अकलूज बस स्थानकाची किमयाच न्यारी आहे, कारण बस स्थानक पासून हाकेच्या अंतरावर अकलूज पोलिस ठाणे,उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय,बांधकाम विभाग कार्यालय, शासकीय विश्राम गृह, आजूबाजूला आलीशान हॉटेल्स,बाजूस आलीशान लोक वस्ती तर सतत वर्दळीचा रस्ता... येवढे सारे काही असूनही नवीन बस स्थानक रात्री विराणवाडा असते?
अकलूज गावचे रुपांतर जरी अकलूज नगर परिषद झाले असले तरी गाव हे निमशहरच म्हणावे लागेल.गावची लोकसंख्या अगदी नगण्य आहे.मात्र इथला विकास शहराला लाजवेल असा आहे. गावच्या विकासांबाबतीत मोहिते पाटील यांनी कधी आकडता हात घेतला नाही. जेवढा अकलूज गावचा विकास करता येईल तेवढा केला. अकलूजचे जुने बस स्थानक हे अगदी अपुऱ्या जागेत आहे. वर्कशॉप तिथेच आहे, जुने बस स्थानक तिथेच आहे, आलेल्या मुक्कामी बस तिथेच असतात, डीएम रेस्ट हाऊस तिथेच आहे.चालक वाहक रेस्ट हाऊस ही तिथेच आहे. कर्मचारी कॉलनी तिथेच आहे.
कालांतराने अपुऱ्या जागेचा विचार करून, पुढे भलेमोठे नविन बस स्थानक बांधण्यात आले.परंतु त्याची निघा एस टी महामंडळ यांना राखता आली नाही.दिवसा सोडले तर रात्रीचे बस स्थानक आंबट शौकिनांचा अड्डा बनले आहे.आणि याकडे अकलूज आगारा कडून दुर्लक्षितपणा केला जात आहे.इथे अनेकदा गंभीर घटना घडल्या आहेत.काही वर्षापूर्वी एका इसमाने बस स्थानकातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर विभाग नियंत्रक यांनी गांभीर्याने विचार करून नवीन बस स्थानक येथे कायम स्वरुपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे गरजेचे होते परंतु केली नाही.
काही महिन्या पूर्वीच आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे हे आकलुज आगारात आले आणि नवीन बस स्थानक येथे चालक वाहक वर्गणी,विविध संघटना यांचे सहकार्य घेऊन नवीन बस स्थानक अत्यंत आकर्षक बनवले.इतर आगाराने आदर्श घ्यावा असे नवीन बस स्थानकाचे रूप बदलवले. सुरक्षा रक्षकाची कमकरता पहाता डी एम नवीन सुरक्षा रक्षक यांची नवीन बस स्थानकात नेमणूक करू शकत नाहीत.याचा विभाग नियंत्रक यांनी गांभीर्याने विचार करून नवीन बस स्थानकात रात्री कायम स्वरुपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
.png)
0 Comments