उपळवटे येथे मराठ्यांचा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल यांच्या
उपोषणाच्या समर्थनात कॅन्डल मोर्चा
माढा (कटूसत्य वृत्त):-माढा तालुक्यातील उपळवटे येथे मराठ्यांचा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल यांच्या उपोषणाच्या समर्थनात कॅन्डल मोर्चा काढण्यात आला आहे मराठा समाजाच्या वतीने माढा तालुक्यातील उपळवटे गावात कॅन्डल मोर्चा काढत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे कॅन्डल मोर्चा च्या माध्यमातून सरकार चा निषेध केला आहे उपळवटे गावातील सर्व मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे जशास तसे किंवा उद्रेक घडू शकतो क्रांतीच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या पद्धतीने येथून पुढची भूमिका घेऊ असे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे त्याला उपळवटे गावातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे
0 Comments