Hot Posts

6/recent/ticker-posts

आशांना ऑनलाईन कामाची सक्ती केल्यास सरकार शी गाठ राहील - कॉ आडम मास्तर

 आशांना ऑनलाईन कामाची सक्ती केल्यास सरकार शी गाठ राहील 

- कॉ आडम मास्तर

आशांचे ऑनलाइन कामाच्या सक्ती विरुद्ध धरणे आंदोलन!


 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य विभागात आशा व गटप्रवर्तक काम करतात. यांचे सर्वकाम हे भागात फिरून करावयाचे आहे. त्यांना कामावर आधारित मोबदला मिळतो. त्यांनी केलेल्या कामामुळेच आज आरोग्याच्या सर्व मोहीमा यशस्वी होताना दिसत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांत त्यांची भुमिका महत्वाची असली तरी त्यांना अतिशय तुटपुंजा मोबदला मिळतो. सद्यपरिस्थितीमध्ये त्यांच्यावर विनामोबदला अनेक कामे लादण्यात येत आहेत. दबाव टाकुन ही कामे करून घेतली जात आहेत. तसेच ऑनलाईन कामाच्या संदर्भात आशा व गटप्रवर्तकांच्या अडचणी व त्यांच्यावर असलेल्या इतर कामांची जबाबदारी यांचा विचार न  करता आपल्या आशा व गटप्रवर्तकांना कोणत्याही ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये.अन्यथा सरकार शी गाठ राहील असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांनी दिला.  

गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी लाल बावटा आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तक युनियन च्या वतीने न्याय व हक्काच्या मागण्याबाबत केंद्र व राज्य स्तरावर आपल्यावतीने शिफारस करून त्यांच्या मागण्यांना मान्य करावे ही प्रमुख मागणी घेऊन सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
 
यावेळी युनियनच्या नेत्या कॉ. पुष्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना शिष्टमंडळा द्वारा निवेदन देण्यात आले. यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की जर शासनाने या मागण्या मान्य नाही केल्या तर बेमुदत उपोषण करावे लागेल. यावेळी शिष्टमंडळात  कॉ. रुपाली दोरकर,कॉ. सिध्दाराम उमराणी आदींची उपस्थिती होती.
Reactions

Post a Comment

0 Comments