Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

 माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून रस्ता

 कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक 22 येथील विजापूर नाका शांतीनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख, सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत 34 लाख 74 हजार 34 रुपये खर्चित रस्ता कॉंक्रिटीकरण, रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव, शितल गायकवाड, ह.दे. प्रशालेचे अनिल अंकुशराव, नाईकवाडी सर बाबुराव सोनवणे, पोलीस निरीक्षक सुनगार साहेब, विश्वास तळभंडारे,संजय घाटगे, विद्याधर भालशंकर, संतोष खंदारे प्राध्यापक विद्यानंद शिरकगली, अशोक रायचूरकर, रोहित तुर्भे, महादेव राठोड, वसंत कांबळे, माणिक कांबळे, वाहिद कुमसेकर, नंदा मंनचुरे, सुमन शिंदे, ज्योती फडतरे,शबाना अफा तहसीलदार, महानंदा भंडारे, प्रभावती सोनवणे, यांच्यासह प्रभागातील युवक,ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींच्या उपस्थितीत या रस्ता काँक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचे विधिवत पूजन होऊन या कामाचे शुभारंभ करण्यात आले. प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांच्या समस्या तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून त्यांच्या सहकार्यातून आज पर्यंत नागरी समस्या सोडवण्यासाठी भरघोस निधी आपण आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला येणाऱ्या काळात स्थानिक रहिवासी कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक रहिवाशांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू दे अशी भावना यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केलं. आपल्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी झटणारा आणि निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता तसेच श्रीमंत व गरीब असा भेदभाव न करता सर्वांची कामे करणारा व नागरिकांचे समस्यांचे निरसन करणारे व त्यांचे प्रश्न सोडवणारा आपल्या जबाबदारीची जाणीव असणारा व कामकाजाची चांगली माहिती असणारा नगरसेवक म्हणून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्याकडे पाहिलं जातं स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. प्रभाग क्रमांक 22 च्या सर्वांगीण विकासासाठी येथील स्थानिक रहिवासी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पाठीशी सदैव उभे राहतील अशी भावना या रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी येथील स्थानिक रहिवाशांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments