मोहोळ येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या निधीसाठी प्रयत्न करू - खा महास्वामी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 13, 2023

मोहोळ येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या निधीसाठी प्रयत्न करू - खा महास्वामी

 मोहोळ येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या निधीसाठी प्रयत्न करू 

- खा महास्वामी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केल्याबद्दल खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानत, पुढील काळात रुग्णालयात रूग्णांना चांगल्या सुविधा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

खासदार महास्वामी यांनी आज मोहोळ येथील ग्रामिण रुग्णालयाला भेट देऊन कार्यकर्ते आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्याकडे भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी वारंवार पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास मान्यता मिळवून घेतली असल्याचे सांगितले. मोहोळ येथील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार असून, मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर, चेन्नई-दादर एक्सप्रेस या गाड्यांना लवकरच थांबा मिळणार आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे. उपजिल्हा रुग्णालयाला लवकरात लवकर निधी मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खा महास्वामी यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, संजय क्षीरसागर, जिल्हाउपाध्यक्ष सतीश काळे,शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, फंटू गोफणे, मधुकर पाटील,प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा सहसंयोजक अविनाश पांढरे, तालुका सरचिटणीस महेश सोवनी, सतीश पाटील, मुजीब मुजावर, उपाध्यक्ष विनोद देशपांडे, सुशील मोटे ,गुरुराज तागडे ,धनंजय मोहोळकर, तानाजी बनसोडे ,पांडुरंग लेंगरे ,द्रोणा लेंगरे ,आदींसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages