सोलापूर शहरासह पूर्व विभागाचा विकास, आणि युवकांना चांगले शिक्षण, त्यांच्या हाताला काम हेच माझे ध्येय :- प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 13, 2023

सोलापूर शहरासह पूर्व विभागाचा विकास, आणि युवकांना चांगले शिक्षण, त्यांच्या हाताला काम हेच माझे ध्येय :- प्रणिती शिंदे

 सोलापूर शहरासह पूर्व विभागाचा विकास, आणि युवकांना चांगले शिक्षण,

 त्यांच्या हाताला काम हेच माझे ध्येय :- प्रणिती शिंदे


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर शहर काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या (NSUI) अध्यक्षपदी नागेश म्याकल यांची निवड झाल्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त नगर शिव महेश्वरी मंदिराजवळ आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून निराधारांना महिला भगीनींना साड़ी वाटप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मा. नगरसेवक विनोद भोसले, सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, युवा नेते अंबादास बाबा करगुळे, मा. परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष अमर यक्कलदेवी, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, प्रदेश युवक काँग्रेस चिटणीस श्रीकांत वाडेकर, युवराज जाधव, गोविंद चिंता, संजय गायकवाड, मनोज चव्हाण, अंबादास जल्ला, प्रल्हाद कळसकर, मनीष चव्हाण, विक्रम जाधव, आनंद चौगुले, सुभाष वाघमारे, दत्ता सालुंखे, अखिलेश म्याकल, अमर गुंडला, अनिल गाजेंगी आदि मान्यवर होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही असे नागेश म्याकल यांची सोलापुर शहर काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली ही गोष्ठ अभिमानास्पद आहे त्यासाठी तसेच आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देते. या पदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे, युवकांचे प्रश्न सोडवत समाजातील युवकांना काँग्रेस पक्ष्याच्या बैनरखाली आणण्याचे काम करावे. पूर्व भागातील जनता, विडी यंत्रमाग कामगरांच्या आशीर्वादामुळे मी तिसऱ्यांदा निवडणू आले आहे. त्यांचे ऋण कधीच विसरु शकणार नाही. पूर्व भागातील विडी यंत्रमाग कामगारांचे मुलांच्या शिक्षणासाठी मोफत कॉम्फुटर कोर्स, शैक्षणिक साहित्य वाटप, शिक्षणासाठी मदत आणि कर्ज उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरु केले. सोलापुर शहरासह पूर्व विभागाचा विकास, आणि युवकांना चांगले शिक्षण, त्यांच्या हाताला काम हेच माझे ध्येय आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश म्याकल मित्र परिवारानी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages