कुरूल येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा चोरटयांचा अयशस्वी प्रयत्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 13, 2023

कुरूल येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा चोरटयांचा अयशस्वी प्रयत्न

 कुरूल येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा चोरटयांचा अयशस्वी प्रयत्न


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- घराला लावलेला कडी कोंयंडा तोडून आज प्रवेश करून आतील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून, आतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व बँकेची कागदपत्रे असा 90 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. दरम्यान चोरटयांनी गावातीलच जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, तसेच बँकेसमोरील एका किराणा दुकानाचा कडी कोयंडा तोडुन आतील पाचशे रुपयांची रोकड व एक मोटरसायकल असा एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपयाची चोरी झाल्याची घटना कुरूल ता. मोहोळ येथे गुरुवार ता 12 रोजी रात्री पावणेदोन वाजता घडली. दरम्यान पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते, मात्र काहीही हाती लागले नाही. या संदर्भात कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कुरूल येथील रहिवासी ज्ञानेश्वर मारुती माने (वय-47) हे शेतात राहतात. त्यांचे गावात घर आहे. बुधवार ता. 11 रोजी घराला कुलूप लावून ते शेतात गेले होते. दरम्यान गुरुवारी रात्री पावणेदोन वाजता ज्ञानेश्वर यांना त्यांचा पुतण्या भैरवनाथ माने यांनी फोन केला. व तुझ्या घराचा दरवाजा उघडा दिसत आहे, तू लवकर ये, असे सांगितले. ज्ञानेश्वर यांनी घरी येऊन पाहिले असता दरवाजा उघडाच होता, तसेच घरातील लोखंडी कपाटाचाही दरवाजा तोडलेला दिसला. तपासणी केली असता कपाटातील सोन्याची अंगठी, मणी मंगळसूत्र, गंठण, चांदीची जोडवी मासोळ्या व रोख रक्कम 20 हजार रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनाला आले. चोरटे एवढे करून थांबले नाहीत, तर त्यांनी कुरुल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दरवाजाचा कडी कोयंड़ा कापून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तिजोरीला हात न लावल्याने सायरन वाजला नाही. दरम्यान बँकेसमोर असलेले सज्जन मौला तांबोळी यांच्या दुकानाचा कडी कोयंडा उचकटून दुकानातील पाचशे रुपये व एम एच 13 सीसी 573 ही तीस हजार रुपयाची मोटरसायकल चोरून नेली. या संदर्भात ज्ञानेश्वर माने यांनी फिर्याद दिली असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages