माढ्यात बहुजन सत्यशोधक संघाचे स्मशानभूमित धरणे आंदोलन
माढा (कटूसत्य वृत्त):- १४७८३ शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त व शिक्षणाधिकारी यांच्याकडुन घेऊन शाळा बंद करण्याचे षडयंत्र राज्य सरकारचे असुन या निर्णया विरोधात बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने माढा शहरातील स्मशानभूमित धरणे आंदोलन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेतील कलम क्र ४५ नुसार १४ वर्षाखालील बालकांना मोफत शिक्षण देणे हे सरकारला बंधनकारक असताना देखील सरकारने शाळा बंद करण्याचा डाव आखल्याने अनेक बहुजन समाजातील गोर गरिब मुले शिक्षणापासून वंचित रााहणार आहेत.यावेळी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.बहुजन सत्यशोधक संघटनेचे अध्यक्ष सुनिल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुधीर लंकेश्वर,समर्थ आखाडे,अशोक माने,रवी सरवदे,कांचन कांबळे,विकास पवार यांचेसह बहुसंख्येने संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment