तुळजापूर ते शिखर शिंगणापूर शिवशक्ती महामार्गाला मंजुुरी मिळण्यासाठी कावड यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात १५ ऑक्टोबर ला कावड यात्रेचा शुुभारंभ,२१ ऑक्टोबर ला होणार सांगता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 13, 2023

तुळजापूर ते शिखर शिंगणापूर शिवशक्ती महामार्गाला मंजुुरी मिळण्यासाठी कावड यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात १५ ऑक्टोबर ला कावड यात्रेचा शुुभारंभ,२१ ऑक्टोबर ला होणार सांगता

 तुळजापूर ते शिखर शिंगणापूर शिवशक्ती महामार्गाला मंजुुरी

 मिळण्यासाठी कावड यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

१५ ऑक्टोबर ला कावड यात्रेचा शुुभारंभ,२१ ऑक्टोबर ला होणार सांगता



माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर तुळजापूर ते शिखर शिंगणापूर चे शंभू महादेवाचे  मंदिर ही दोन्ही तीर्थस्थाने छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान होते.त्यामुळे ही दोन्ही शिवशक्ती पिठे एकमेकांना जोडणाऱ्या शिवशक्ती  महामार्गाला मंजुरी मिळण्याच्या मागणीसाठी  तुळजापूर ते शिखर शिंगणापूर कावड यात्रा १५ ऑक्टोबर पासून काढण्यात येणार असुन या कावड यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आंदोलनाचे संयोजक संजय कोकाटे यांनी माढ्यात पत्रकार परिषदेत दिली.

कावड यात्रा काढुन १५ ऑक्टोबर पासुन आंदोलनास सुरुवात करीत असल्याची माहिती देण्यासाठी  संजय कोकाटे यांनी माढयातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. शिवशक्ती मार्ग हा  इतर पालखी मार्गाच्या धर्तीवर विकसित करण्यात यावा या मागणीसाठी तुळजापूर ते शिंगणापूर अशी पायी कावड यात्रा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राबरोबरच संबंध देशभरातील  अठरा पगड जातीतील बहुजन समाजातील लोकांची ही पवित्र स्थळे आहेत. संपुर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त लाखो भाविक शंभू महादेवाच्या दर्शनासाठी  कावड काठी घेऊन येत असतात.  तुळजापूर पासून शिंगणापूर पर्यंतचा या कावड काट्यांचा मार्ग ठरलेला आहे.साडेतीनशे वर्षांपूर्वी पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेला हा पारंपारिक ऐतिहासिक पाार्श्वभूमी असलेला मार्ग शिव शक्ती महामार्ग म्हणून घोषित करून या नविन महामार्गाची निर्मिती करुन मार्गाला मंजुरी देण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनास विविध  राजकीय पक्षाच्या नेते मंडळीनी पाठिंबा दर्शवला आहे.या अभिनव आंदोलनास या  मार्गावर असलेल्या गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची चहापान,नाष्टा आणि जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेस रासपाचे पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष माऊली सलगर,भाजपाचे योगेश पाटील, गोरख वाकडे यांचेसह अन्य जण उपस्थित होते.

 कावड यात्रेला प्रारंभ व सांगता खासदारांची उपस्थिती-१५ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथून कावड यात्रेचे दुपारी एक वाजता सुरूवात होत असुन या समारंभास खासदार ओमराजे निंबाळकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत हे उपस्थित राहणार आहेत.तर या आंदोलनाची सांगता २१ऑक्टोंबर रोजी शिंगणापूर येथे होणार असून या समारंभास माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत


 असा राहील कावडयात्रेचा मार्ग-
१५ ऑक्टोबर तुळजापूर येथून कावड यात्रेचे दुपारी एक वाजता प्रस्थान दुपारी ४  वाजता ढेकरी येथे नाष्टा व चहा  सायंकाळी सहा वाजता गौडगाव येथे मुक्काम व जेवण  १६  ऑक्टोंबर आठ वाजता रुई येथे नाष्टा व चहा  दुपारी बारा वाजता मालेगाव येथे जेवण,दुपारी चार वाजता रातंजन येथे चहा नाष्टा,सायंकाळी सहा वाजता वैराग येथे मुक्काम व जेवण.१७  ऑक्टोंबर सकाळी आठ वाजता इरले येथे चहा नाष्टा दुपारी बारा वाजता सुर्डी येथे जेवण सायंकाळी पाच वाजता मालवंडी येथे मुक्काम व जेवण.१८  ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजता जामगाव येथे जेवण.३  वाजता केवड येथे चहापाणी ४ वाजता उंदरगाव येथे चहा नाष्टा.सायंकाळी सहा वाजता माढा  शहरात  जेवण व मुक्काम १९ ऑक्टोबर सकाळी आठ  वाजता जाधववाडी येथे चहा.दहा वाजता चिंचोली येथे चहा नाष्टा.बारा वाजता भुताष्टे येथे जेवणं चार वाजता कुर्मदास सहकारी साखर कारखान्यावर चहा नाष्टा सायंकाळी सहा वाजता पडसाळी येथे मुक्काम व जेवण 20 ऑक्टोंबर सकाळी आठ वाजता भेंडं येथे चहापाणी.दहा वाजता व्होळे येथें नाष्टा चहा बारा वाजता वरवडे येथे जेवण.तीन वाजता परितेवाडी येथे चहा चार वाजता परिते येथे नाष्टा चहा.सहा वाजता बेंबळे येथे मुक्काम व जेवण२१  ऑक्टोबर नऊ वाजता वाफेगाव येथे चहा नाष्टा बारा वाजता गणेशगाव पाटी येथे नंदेश्वर मंगल कार्यालयात जेवण जेवणानंतर वाहनातून शिंगणापूर कडे रवाना. शंकर कारखाना सदाशिवनगर येथे तीन वाजता चहा नाष्टा सहा वाजता शिखर शिंगणापूर येथे कावड यात्रेची सांगता व जेवण.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages