महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळणाऱ्या बेबी केअर किट चौकशी ...!
माढा(कटूसत्य वृत्त):-आपल्या सेवेत सविनय सादर करतो की, अ प्रकाश दत्तात्रय गोसावी मौजे उपळवटे, ता. माढा, जि. सोलापूर येथील कायमस्वरूपीचा रहिवाशी असून उपळवटे गावातील अंगणवाडी क्रमांक एक व दोन मध्ये अनेक लहान मुलांच्या नोंदी असून त्यांचे वय तब्बल एक वर्ष होऊन गेले तरी त्यांना वेबी केअर कीट अद्याप मिळालेले नाही. एकीकडे गरीब, भूमिहीन, अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेली मुले यापासून वंचित आहेत तर दुसरीकडे गडगंज संपत्ती असलेल्यांना हा लाभ घरी जाऊन दिला जातोय.अंगणवाडी सेवीकेला या संदर्भात विचारणा केली असता आमच्या हातात काही नसते वरून आले तर आम्ही देतो असे सांगितले जाते. जन्मलेल्या बाळाला दोन वर्षे झाली तरी या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने या प्रकरणाची आपण गांभीर्याने दखल घेऊन खन्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची व्यवस्था करावी.अंगणवाडीमध्ये काही अपहार होत असेल तर याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा युवा भिमसेना सामाजिक संघटना माढा तालुक्याच्या वतीने येणाऱ्या काळात पंचायत समिती समोर सर्व माता पालकांना घेऊन ठिय्या आंदोलन केले जाईल.

0 Comments