शेतकऱ्यांनो, " आत्महत्या करू नका,
दिनांक 22, 23 ऑक्टोबरला मुंबई येथे दोन दिवशीय प्रशिक्षण...!
जनता सरकार मोर्चामध्ये सहभागी व्हा...!!
श्रीयुत नवनाथ दुधाळ यांचे आवाहन...!!!
सोलापूर( कटू सत्य) : -शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. असे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या मातीवर शेतकऱ्यांनो तुमचा जन्म झाला आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि या देशांमध्ये शेतकऱ्यावरच संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असल्यामुळे बांधवांनो आत्महत्या करू नका टेन्शन फ्री रहा असे आवाहन जनता सरकार मोर्चाचे समन्वयक नवनाथ दुधाळ यांनी केलं असून या प्रशिक्षणामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहून जनता मोर्चा ला सहकार्य करावे .कारण तुम्हाला सर्व षडयंत्रातून बाहेर काढणारा हा एकमेव मार्ग आहे. तरी आपण भावेश परमार MO: -7977209407 यांच्याकडे ताबडतोब नाव नोंदणी करावी असे आवाहन नवनाथ दुधाळ यांनी केलं आहे.
यावेळी पुढे बोलताना समन्वयक नवनाथ दुधाळ म्हणाले की, " हम 1857 की क्रांति के भटके हुए क्रांतिकारी है, हम तब तक क्रांती करेंगे, जब तक भारत पूरी तरह से स्वावलंबी नही बन जाता/ हीच आपल्या थोर क्रांतिकारकांची विचारधारा घेऊन जनता सरकार मोर्चा च्या वतीने शेतकऱ्यांसाठी दिनांक 22 , 23 आँक्टोबर 2023 रोजी मुंबई आणि पनवेल या ठिकाणी दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. असं आवाहन यावेळी जनता सरकार मोर्चाच्या वतीने समन्वयक नवनाथ दुधाळ यांनी केलं आहे. पुढे बोलताना दुधाळ म्हणाले, " कर्ज काढणे हा गुन्हा नाही... शेतकऱ्यांनो, व्यापाऱ्यांनो, वाहन चालक मालकांनो तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आता जनता सरकार मोर्चा तुमच्या सोबत आहे त्यामुळे टेन्शन फ्री रहा. तुमच्यावर बँकेचे कर्ज आहे तुम्ही कर्ज फेडू शकत नाही का..? बँकेने तुमच्या घरावर, गाडीवर, शेतीवर जप्ती आणली आहे का..? थांबा आत्महत्या करू नका कोणतेही कर्ज असो जनता सरकार मोर्चा नील करून देणार...! त्यासाठी धाराशिवला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे.
* या आषाढी यंत्रातून जल, जमीन, जंगल आणि जनावरे कशी वाचवाल..?
* शेतकऱ्यांनो यावर अधिकार गावाचा आहे तो गावाकडेच राहिला पाहिजे, सरकारकडे नाही.
* शिक्षण, आरोग्य, न्याय ,राजकारण आणि शेती हे सगळे षडयंत्रात अडकलेले आहेत. त्यांना बाहेर कसे काढणार...?
* प्रत्येक गावच्या लोकांना गावात शिक्षण, नोकरी, रोजगार, आरोग्य आणि नैसर्गिक भोजन मिळणार बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.
* शेतकरी स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवणार..! तो त्याचा अधिकार आहे.
* कोरोना आणि लॉकडाऊन च्या षड्यंत्रातून कसे वाचाल...?
* अहो शरीर आपलं जमीन आपली गाव आपलं आणि त्यावर अधिकार सरकारचा..?
* मुल स्वतःच त्यावर अधिकार सरकारचा..?
* पूर्ण काळानंतर वाढलेले आजार कॅन्सर ,बीपी ,शुगर, हार्ट अटॅक इत्यादीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे याला जबाबदार कोण..?
या आणि यासारख्या असंख्य श्रुंखलेतून अर्थातच साखळी वजा षडयंत्रातून आपल्याला बाहेर काढणार जनता सरकार मोर्चा..!
या मोर्चासाठी हरियाणा पंजाब या ठिकाणाहून हे क्रांतिकारी कार्य करण्यासाठी क्रांतिकारी डॉ. देवेंद्र बल्लारा जी, सुनील शर्मा जी, संजीव कुमार जी, चाँद सिंग जी, नरेंद्र भाई जी, आणि मुकेश कुमार जी शेतकरी राजा कर्जमुक्त व्हावा. हीच विचारधारा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई आणि पनवेल या ठिकाणी येत आहेत.
या प्रशिक्षणामध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर, रुपयाचा इतिहास, 2030 चा अजेंडा, लोकसंख्या नियंत्रणात होण्यासाठी लोकसंख्या कमी करणे, लसीकरण एक षडयंत्र, भारतीय शिक्षण, व्यवसायात्मक शिक्षण काळाची गरज, भारतीय शेतीचे नुकसान, ग्लोबल वार्मिंग मुळे होणारे नुकसान, भारतीय संस्कृती आणि तिचा होत चाललेला -हास, भारतीय संविधानात जबरदस्तीने केले जाणारे बदल, बँकांचे मायाजाळ, शेतकरी मात्र कर्जबाजारी, आरोग्य बाबतच्या विविध समझुती, समाज व्यवस्था कशी असावी या अनेक विषयांवर वरील मार्गदर्शक आपले परखड विचार मांडणार असल्यामुळे या जनता दरबार मध्ये शेतकरी राजाने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. या प्रशिक्षण कालावधीमध्ये सर्वांना मुक्कामाची सोय करण्यात आली असून दोन वेळेस हरबल टी म्हणजे काढा, एक वेळेस नाश्ता, दोन वेळा जेवण अशी दोन दिवस सोय करण्यात आली असून नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे. याचबरोबर स्त्रियांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून स्त्रियांनी सुद्धा या जनता सरकार मोर्चामध्ये सहभागी व्हावे. आणि नारीशक्तीची ताकद दाखवून द्यावी.
.
प्रशिक्षणार्थींनी येताना
स्वतःसाठी चादर, सतरंजी, पेन्, वही इत्यादी साहित्य घेऊन यावे. असे आवाहन जनता सरकार मोर्चा च्या वतीने नवनाथ दुधाळ जी आणि टीम च्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments