Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना रमेश लांजेवार यांची संघटनेच्या महाराष्ट्र प्रवक्ते पदी नियुक्ती.

 महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना रमेश लांजेवार यांची संघटनेच्या

 महाराष्ट्र  प्रवक्ते पदी नियुक्ती.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कलाल-कलार समाजासाठी गेली अनेक वर्षांपासून लोकशाहीच्या मार्गाने रमेश लांजेवार कार्य करीत आहेत.त्याचप्रमाणे त्यांनी 1996 पासून लेखणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजिक कार्य केल्यामुळे त्यांना 2019 ला चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार सुध्दा मिळालेला आहे.यामुळे त्यांना मुक्त पत्रकार ही उपाधी सुध्दा मिळाली आहे.त्यामुळे त्यांची सामाजिक कार्यात व समाजामध्ये मोठी ख्याती आहे.संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात कळत नकळत नेहमीच अग्रणीय भुमिका असते. त्यांच्यातील समाजाविषयी तळमळीमुळे संघटनेला एक नवीन दिशा मिळाली आहे.त्याचप्रमाणे  त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य,जिद्द आणि सामाजिक कार्यातील बांधीलकी व भरीव कामगिरी पहाता महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रवक्ते पदी संघटनेचे मार्गदर्शक श्री चंद्रपाल चौकसे,माजी राज्यमंत्री डाँ अविनाश वारजुकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार सरचिटणीस संतोष खंबलवार यांनी एकमताने नियुक्ती केली असून संघटनेला मोठे बळ मिळाले आहे रमेश लांजेवार यांची महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्याबद्दल अनेक पदाधिकाऱ्यांची अभिनंदनाचा वर्षाव केला आहे यामध्ये रविंद्र हटवार, पप्पु जैस्वाल (मा.अध्यक्ष जि.प वर्धा),संजय हिवाळे सोशल मीडिया राज्य प्रमुख, ओम संदीप डगवार,दिपक ऊके, बाळासाहेब लाळे,कमलेश डगवार, महाराष्ट्र अध्यक्ष सागर समुद्रवार,सरचिटणीस संतोष खंबलवार, महिला प्रदेशाध्यक्ष सौ सिमा खंबलवार, सुरेश मेश्राम, नंदलाल कावरे,विदर्भ अध्यक्ष महिला सौ रेखा प्रिंपाळे,अकोला शहर अध्यक्ष मनोज मेश्राम,नयन ताडपिल्लेवार,सुनील ऊके इत्यादींसह अनेक मान्यवरांनी रमेश लांजेवार यांना पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments