Hot Posts

6/recent/ticker-posts

बेकायदेशीर 'न्यू टेक रिसायकल प्रोडक्ट' कंपनीवर पालकमंत्र्यांची कृपादृष्टी! मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी-हेमंत पाटील

 बेकायदेशीर 'न्यू टेक रिसायकल प्रोडक्टकंपनीवर पालकमंत्र्यांची

 कृपादृष्टी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी-

हेमंत पाटील

पुणे(कटूसत्यवृत्त):- बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या 'न्यू टेक रिसायकल प्रोडक्टया कंपनी विरोधात कारवाई करा,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहेयासंदर्भात त्यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे.तक्रारीची दखल घेण्यात आली नाही तर सातारातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू,असे पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

 

ज्या भूखंडावर ही कंपनी उभारण्यात आली आहेती जमीन बिगरशेतीसाठी नसतांना देखील या कंपनीला परवानगी देण्यात आलीच कशीअसा सवाल देखील पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.ज्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला अभय दिला त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील पाटील यांनी केली.जिल्हाधिकाऱ्यांना कंपनीविरोधात तीन वेळा निवेदन देवून देखील त्यांनी कारवाई केली नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आशीर्वादाने नलगे बंधु बेकायदेशीर रित्या कंपनी चालवत आहेत.देसाई नलगे कुटुंबियांना पाठीशी घालत असल्याने त्यांचे फावत आहेत.मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली.

 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या दुधानवाडी परिसरातील गट क्रमांक  मध्ये ही कंपनी उभारण्यात आली आहे.पंरतु,शेतीचा विनापरवाना औदयोगिक वापर केला जात आहे.त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अगर वेळोवेळी अस्तित्वात आलेल्या कायदयानुसार शेतीचा विनापरवाना औद्योगिक करणाकरीता बेकायदेशीर वापर केल्याबद्दल कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.सदर जागेचे रुपांतर औदयोगिक बिनशेतीमध्ये जोपर्यंत होत नाही,तोपर्यंत सदरची कंपनी बंद करण्याचे आदेश द्यावे,अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे.विशेष म्हणजे सदरची कंपनी दुधानवाडीबनवाडीअरबवाडी या मुख्य रस्त्यालगत असल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून होणार्या अवजड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेतही सर्व वाहतूक बंद करण्याच्या सूचना देण्यात यावात तसेच सदर कंपनीचे दुषित पाणीहवा प्रदुषणामुळे वन्य प्राणी यांचा निवारा आरोग्य धोक्यात आल्याने कंपनीचे  सुर्दशन सूर्यकांत नलगे  सचिन नलगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावाअशी मागणी देखील पाटील यांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments