Hot Posts

6/recent/ticker-posts

आई-वडील रागावल्याने नववीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 आई-वडील रागावल्याने नववीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अभ्यास कर..शाळा चांगली शिक म्हणून आई-वडिलांनी सांगितल्याचे मनात राग धरून नववीत शिकणा-या विद्यार्थ्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश अनिल गायकवाड (वय १५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून ३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्यासुमारास बार्शी तालुक्यात ममदापूर येथे ही घटना घडली.

याबाबत पांगरी पोलिसात नोंद झाली आहे. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार आकाश गायकवाड हा नववीच्या वर्गात शिकत होता. शाळा व्यवस्थित शिक, शाळा व्यवस्थित शिकला नाही तर जनावरे राखावी लागतील असे बोलून आई-वडील बार्शीला गेले. परत आल्यानंतर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी त्याला तत्काळ पांगरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी पांगरी पोलिसात खबर दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments