वैरागमध्ये शिक्षकाचे घर फोडले; २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
वैराग (कटूसत्य वृत्त):-दत्तनगरमधील शिक्षकाचे बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने नेल्याप्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरीची घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते मंगळवार ३ आक्टोबर दरम्यान शिक्षक सुनील हुकिरे (रा. दत्तनगर वैराग, ता.बार्शी) यांची घरी घडली. फिर्यादी हे पत्नीला व मुलीस माहेरी लातूर येथे सोडून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे कामकाजाकरिता मुंबई येथे गेले असताना २९ रोजी घरास कुलूप लावून गेले होते. ते मुंबई येथे असताना ३ रोजी सकाळी आठच्या सुमारास शेजारी विलास रेपाळ यांनी मोबाईलवरून चोरीची घटना सांगितली. यामध्ये ४ हजार रुपये किमतीची कानातील सोन्याच्या काड्या, चार हजार पाचशे रुपये किमतीचे चांदीची तीन जोड जोडवी, अठरा हजार रुपये किमतीचे चांदीचे सात पैंजण जोड व पंधराशे रुपये रोख रक्कम असे एकूण किंमत २८ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
.jpg)
0 Comments