आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून 6 ऑक्टोबर रोजी आमदार चषक
स्पर्धा...!
श्रीराम तरुण मंडळ आणि कबड्डी असोसिएशनचा सहभाग...!!
मरगू मास्तर क्रीडांगणावर होणार स्पर्धा...!!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर मध्य च्या कर्तव्यदक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी आमदार चषक स्पर्धा श्रीराम तरुण मंडळ, उमेद पूर आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने खुल्या विभागीय पुरुष आणि महिला( कुमार/ कुमारी किशोर/ किशोरी) कबड्डी सामन्यांचे मैदान दिनांक 6 ऑक्टोबर 2023 ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सोलापूर येथील मरगू मास्तर क्रीडांगण सेटलमेंट या ठिकाणी होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष देविदास चव्हाण कार्यकारणी सदस्य गिरीष जाधव आणि मंडळाचे सचिव प्रकाश जाधव यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जाधव म्हणाले की, " श्रीराम तरुण मंडळ गेल्या पन्नास वर्षापासून कबड्डी खेळाची आवड सर्व तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचावी. कबड्डी खेळाडूचे उन्नती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कबड्डीच्या स्पर्धा घेऊन खेळाडूंमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा श्रीराम तरुण मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे होत आहे. या मंडळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय विद्यापीठ तसेच राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारूपाला आले असून हे काम मंडळाच्या माध्यमातून पुढेही चालूच राहील. कबड्डी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर कित्येक खेळाडूंना सरकारी नोकरी सुद्धा मिळाली असून साधारणपणे दीडशे ते दोनशे तरुणांना पोलीस खात्यात नोकरी सुद्धा कबड्डी या खेळामुळेच मिळाली आहे. या खेळाचे महत्व वाढवण्यासाठी श्रीराम तरुण मंडळ अखंडपणे प्रयत्न करत असून सध्या या मैदानावर कर्तव्यदक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून भव्य इंडोर स्टेडियम बांधण्यासाठी 3. 17 लाख रुपये निधी मंजूर झाला असून स्टेडियम बांधण्याचे आदेश मिळालेले आहेत जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी आमदार निधीतून पाच लाख रुपये मंजूर करून स्पर्धा घेण्याकरता मंजुरी मिळाली असल्याचं यावेळी प्रकाश जाधव यांनी सांगितलं. या मैदानावर व्यायाम शाळा समाज मंदिर असून या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून जिमचे साहित्य उपलब्ध झाल्यामुळे दररोज या ठिकाणी 80 ते 100 खेळाडू व्यायाम करून आपली शरीर कमवत आहेत. दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी याच मैदानावर निवड चाचणी स्पर्धा खुला विभाग पुरुष व महिला जिल्ह्यातील एकूण विभागातील 700 ते 800 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून या स्पर्धा सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिनांक 6 ऑक्टोबर 2023 ते 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत घेण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती यावेळी अध्यक्ष देविदास जाधव आणि सचिव प्रकाश जाधव यांनी दिली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून आमदार चषक जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचं खुला विभाग पुरुष व महिला (कुमार/ कुमारी किशोर/ किशोरी) जिल्ह्यातील 700 ते 800 खेळाडू सहभाग घेणार आहेत. या सर्व स्पर्धेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे मुलाचे सहकार्य लाभलं असल्याचं श्रीराम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
या पत्रकार परिषदेला अध्यक्ष देविदास जाधव, सचिव प्रकाश जाधव, कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह. मदन गायकवाड ,उपाध्यक्ष महादेव जाधव ,गणेश जाधव, खजिनदार धनराज गायकवाड, कार्यकारणी सदस्य गिरीष जाधव, अभय जाधव, गोपाल नंदुरकर, विजय जाधव, विठ्ठल जाधव, विजय जाधव, मयूर जाधव, रियाज शेख, शैलेश जाधव, आणि यती राज जाधव आदी उपस्थित होते.
.jpg)
0 Comments