मैदानी खेळ होताहेत फस्त...! बच्चे कंपनी मोबाईल मध्ये व्यस्त...!!
सोलापूर (सचिन जाधव):- सध्याच्या इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक शाळेतील मुलगा "खेळ नको मला मोबाईल द्या" असा हट्ट पालकांकडे धरू लागल्यामुळे मर्दानी आणि मैदानी खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी लाल मातीवरील कुस्त्या, आट्यापाट्या, कबड्डी, सूर पारंबा यासह विविध मैदानावरील खेळ सध्याच्या मोबाईलने पूर्णपणे गिळंकृत केल्याचे दिसत आहे. वाचनाची आवड आणि मैदानावर जाऊन लाल मातीवर खेळणारे खेळाडू सध्या मोबाईल स्क्रीन भोवतीच हरवून गेल्यामुळे त्यांचं बालपण हे मोबाईलने हिरावून घेतले की काय..? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार बारा वर्षे वयोगटातील साधारणपणे 42 टक्के मुले दररोज सरासरी दोन ते पाच तास आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर मोबाईलला चिकटलेली दिसतात. तर यापेक्षा मोठ्या वयोगटातील मुले आपला 47% वेळ दररोज मोबाईल आणि चॅटिंग वर आणि गेम खेळण्यावर घालवत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे. मनोरंजनाच्या सर्व सुविधा स्क्रीनवर आल्यामुळे या मुलांच्या आयुष्याची दोस्ती स्क्रीन बरोबरच झालेली आहे. त्यामुळेच बारा वर्षे वयोगटातील साधारणपणे 42% च्या पुढे मुले दररोज चार ते पाच तास मोबाईल स्क्रीन मुळे आंधळी होऊ लागली आहेत. 74 टक्के मुलं youtube च्या दुनियेत हरवले असून 71 टक्के मुलांना गेमिंग जास्त आवडत असल्याचे अहवालामध्ये सांगितल आहे. सध्या रेल्वे स्टेशन आणि इतर काही कंपन्यांमध्ये वायफायची सुद्धा सुविधा असल्यामुळे अनेक जण मोबाईलवर नुसत्या चॅटिंग करण्यामध्ये आपला आयुष्य घालू लागले आहे. यामध्ये बारा वर्ष वयोगटातील मुले ही मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्यामुळे आणि स्मार्टफोनमुळे ही मुलं बिघडू लागली आहेत. ज्या घरामध्ये अशा प्रकारची साधने उपलब्ध पालकांनीच मुलांना करून दिले आहेत अशा जबाबदार पालकांनी आपली मुले मोबाईलवर कोणत्या चुकीच्या घटना पाहतात ते पाहून चुकीच्या पाहण्यापासून त्यांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्या बरीच मुले शिक्षणाच्या नावाखाली स्मार्टफोनचा वापर करत असून त्यामध्ये प्रोत्साहन देणारे व्हिडिओ न बघता फक्त गेमिंग वर हे विद्यार्थी भर देऊ लागल्यामुळे शिक्षणापासून मनोरंजन आणि सर्व काही डिजिटल होत असली तरी स्मार्ट उपकरणे आजच्या मुलासाठी जेवढी वरदान ठरले आहेत. तेवढीच ती धोकादायक सुद्धा आहेत. यासाठी पालकांनी दक्ष असणे गरजेचे आहे. मोबाईलवर तासंतास वेळ गेल्यामुळे बऱ्याच मुलांचा शाळेतील गृहपाठ किंवा इतर अभ्यास पूर्ण होत नसल्याचे सुद्धा अनेक वेळा दिसून आलेले आहेत. त्यामुळे शासनाने सुद्धा मोबाईल न बघणाऱ्या विद्यार्थ्याला विशिष्ट पारितोषिक देऊन सन्मानित करून त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करून पुस्तकाची पुन्हा एकदा चळवळ उभा राहिली पाहिजे तरच देश आर्थिक महासत्ता बनेल अन्यथा नाही.
.png)
0 Comments