लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन पर व्याख्यान मार्गदर्शन
वडाळा (कटूसत्य वृत्त):-श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्याचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून माजी विद्यार्थी अतिश शिंदे (ज्युनिअर असिस्टंट, ग्रामीण बँक), प्रशांत लोंढे, संदेश लोकरे उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी असणाऱ्या विविध परीक्षा, त्यासाठी असणारा अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता याबद्दल माजी विद्यार्थी अतिश शिंदे यानी माहिती दिली. बँकेमध्ये दैनंदिन कामासाठी लिपिक व प्रोफेशन ऑफिसर बरोबरच विषयातील स्पेशलिस्ट ऑफिसर ची आवश्यकता असते. बँकेतील नोकरीला आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. उदारीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या काळात खाजगी बँकाविषयी आकर्षण वाढले आहे. गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांनी आपली कामगिरी टिकवून आपला व्यवसाय वाढविला. यामुळे बँकांमध्ये सध्या नोकरीच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी या क्षेत्रातील संधी व आव्हाने स्वीकारून या दृष्टीने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत प्रमुख मार्गदर्शक यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना असलेल्या शंकांचे योग्य पद्धतीने निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती गायकवाड व आभार प्रदर्शन डॉ. सचिन फुगे प्राचार्य, कृषी महाविद्यालय यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment