Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा

 लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन

 उत्साहाने साजरा


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन आणि विकास संस्था संचालित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्यार्थी आशिष पालवे यांनी केले केले.  कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ.अमोल शिंदे  हे लाभले होते. त्यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भारताचे मिसाईलमॅन डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास व कार्य याविषयी मार्गदर्शन केले. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीवरती व्यक्त होण्यासाठी वाचन खूप महत्वाचे आहे. सध्याच्या काळात वाचन हे खूप कमी झाले आहे त्यासाठी आपल्याला वाचन करणे महत्त्वाचे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.  महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिक्षा गुंड, दक्षता देशमुख आदींनी मनोगतातून डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी माहिती दिली व वाचनाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून डॉ. ए. पी. जे. जे अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास व कार्य विशद करण्यात आले. या कार्यक्रमास  प्रा. सागर महाजन, प्रा. प्रदीप आदलिंगे, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. नंदकिशोर खुने, प्रा. पुनम उंबरे, प्रा. सायली बडेकर  तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आशिष पालवे व आभारप्रदर्शन राधिका घुगे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments