Hot Posts

6/recent/ticker-posts

नागरी बँक्स् असोसिएशनला बँकिंग फ्रंटिअर्सचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

 नागरी बँक्स् असोसिएशनला बँकिंग फ्रंटिअर्सचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार  


माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनला बँकिंग फ्रंटिअर्सचा बेस्ट कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी ट्रेनिंगचा राष्ट्रीय पातळीवरील सन-2023 चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याची माहिती नागरी बँक्स् असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत यांनी दिली आहे.

गोवा येथे नुकतीच देशातील 400 नागरी बँकांची दोन दिवसीय राष्ट्रीय सहकारी परिषद  पार पडली.या परिषदेच्या वेळी एका शानदार सोहळ्यात गोव्याचे सहकार मंत्री ना.सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत व संचालक दिनकर देशमुख यांनी स्वीकारला.

या परिषदेमध्ये वित्त व जोखीम व्यवस्थापनाचे पुनरुज्जीवन, पायाभूत सुविधांना ऊर्जा व ऑप्टिमाइझ करणे,व्यवसाय लँडस्केप, ट्रिलियनच्या दिशेने क्षेत्राच्या वाढीला ऊर्जा देणारी इकॉनॉमी-व्हीएमवेअर आदी विषयांवर विविध राज्यांतील मान्यवर बँकिंग तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.या परिषदेला महाराष्ट्र,राजस्थान, गुजरात,केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश,दिल्ली,तेलंगणा, आंध्रप्रदेश, झारखंडसह विविध राज्यांतील नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी,संचालक व अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बँकांना विविध सुविधा पुरविणे, पतपुरवठा व वसुली करण्यासाठी मार्गदर्शन,मोबाईल बँकिंग व सायबर सेक्युरिटी, राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे विश्वासाहर्ता जपण्यासाठी संचालक मंडळ व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी याविषयीचे बहुमोल मार्गदर्शन या परिषदेत मिळाल्याची माहिती नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत यांनी दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments