इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं संबळ आणि
हलगीच्या निनादात मोटारसायकल रॅली काढत शक्ती देवीची
प्रतिष्ठापना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेच्या जय जयजयकारात अमाप उत्साही वातावरणात इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाची शक्ती देवी प्रतिष्ठापना मिरवणूक हलगीचा कडकडाट, संबळाचा निनाद आणि आई राजा उदे उदे च्या जयघोषात शक्ती देवीची जागर करीत शक्ती देवीची प्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात आले दरम्यान रविवारी रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिस येथून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे सोलापूर ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सदर बाजार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर, सलगर वस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष सुहास कदम, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक तथा उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे, मंडळाचे मार्गदर्शक तथा संस्थापक लक्ष्मण मामा जाधव, मंडळाचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव, मार्गदर्शक माजी नगरसेवक नागेश गायकवाड, उत्सव अध्यक्ष अंबादास गायकवाड, हजारे साहेब, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, मोहन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, मोहन जाधव, विष्णू गंगुल, शितल गायकवाड, जनकल्याण मल्टीस्टेट चे चेअरमन राजेंद्र हजारे शिवराज जाधव सांगोल्याचे बबलू भैया, फारुख शेख, सचिन उर्फ अक्षय जाधव,संतोष गायकवाड, निलेश कांबळे, उमेश जाधव,हरीश तेलुगु, अमोल लकडे, सागर कांबळे, सचिन पिसे, नईम अड्डेवाले, दर्शन दुबे, विजू भाऊजी, विनोद भाऊजी, नितीन भाऊजी, तुषार गायकवाड, विशाल गायकवाड, बक्सु सय्यद,संजू गायकवाड सचिन आंगडीकर, माऊली जरग, ऋषी येवले, माणिक कांबळे, वसंत कांबळे फुलगप्पा राम मिस्त्री, आप्पासाहेब बिलगुडे,आदींसह मंडळाचे पदाधिकारी तसेच इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य व देवी भक्तांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाचे संस्थापक तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांनी फेटा बांधून शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार केला. शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून आरक्षण 9 रात्री साजरा होतो नवरात्रीमुळे सर्वत्र देवीचा जागर करण्यात येतो विविध हिंदू संस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते दरम्यान इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं शक्ती देवेच्या आगमनानिमित्त पारंपारिक पद्धतीने मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने सवाद्य मिरवणूक काढून शक्ती देवीचा जागर मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केले. शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त सर्वत्र उत्साह व नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे या उत्सवात देवीचा जागर केला जातो इच्छा भगवंताची नवरात्र मंडळच्यावतीनं अत्यंत शिस्तबद्ध अशी पारंपारिक वाद्यासह मिरवणूक काढून देवीचा जागर करण्यात आल्याचे मनोगत पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी व्यक्त केला... दरम्यान मंडळाचे यंदाचे 24 वे वर्ष असून पुढच्या वर्षी मंडळाच्या 25 वर्षाचे अवचित्य साधून शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात महिला भगिनींसाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तसेच येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये इच्छा भगवंताची नवरात्र मंडळच्यावतीनं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तसेच इच्छा भगवंताची नवरात्र मंडळाच्या विषयी मंडळाचे कार्याध्यक्ष किसन जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं.... यावेळी संबळ आणि हलगीच्या निनादात ताल धरत कार्यकर्त्यांनी यावेळी ठेका धरला आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे चा जयजयकार करत मिरवणुकीत मोठ्या संख्येने इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते देवी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरचे मिरवणूक सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिस कार्यालयापासून मिरवणुकीस प्रारंभ होऊन महात्मा गांधी पुतळा मार्गे मोदी, रामवाडी, सेटलमेंट आदी भागातून निघून सेटलमेंट येथे मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात आदिशक्तीचा जागर करत शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना धार्मिक विधिवत पुजनात आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे चा गजर करत करण्यात आला.
.png)
0 Comments