सृष्टी हनुमंत पिसाळ ट्रिपल जंप स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेला निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 13, 2023

सृष्टी हनुमंत पिसाळ ट्रिपल जंप स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेला निवड

 सृष्टी हनुमंत पिसाळ ट्रिपल जंप स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेला निवड


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये विनायकराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी हनुमंत पिसाळ हिने ट्रिपल जंप या प्रकारामध्ये दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

      सृष्टी हनुमंत पिसाळ हिने ट्रिपल जंप या प्रकारात 9.12 मीटर उडी मारून जिल्ह्यात नवीन रेकॉर्ड स्थापन केले.  विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने वडिल हनुमंत पिसाळ , व आई रजनी पिसाळ व कुटुंबाने आनंद व्यक्त केला.  यावेळी भोसरे ग्रामस्थांच्या वतीने सृष्टीवर अभिनंदन चा वर्षाव करण्यात आला . त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या वतीनेही सृष्टीचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages