जरांगे पाटलांच्या सभेला 30 ते 35 हजार मराठा समाज बांधव सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित राहणार- समन्वयक माऊली पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 13, 2023

जरांगे पाटलांच्या सभेला 30 ते 35 हजार मराठा समाज बांधव सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित राहणार- समन्वयक माऊली पवार

 जरांगे पाटलांच्या सभेला 30 ते 35 हजार मराठा समाज बांधव सोलापूर

 जिल्ह्यातून उपस्थित राहणार- समन्वयक माऊली पवार


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सकल मराठा समाजाचे सोलापूर शहर आणि जिल्हातून मराठा संघर्ष योध्दा  मा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी ता. आंबड जिल्हा जालना येथील मराठा आरक्षण परिषदेला  संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातून उस्फूर्तपणे  ३० ते ३५  हजार मराठा बांधव  आरक्षण परिषदेला हजर राहण्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी  जवळ जवळ ३ हजार गाड्या निघणार असून  कांहीं मराठा तरुण दुचाकी आणि इतर वाहतुकीच्या साधनांनी आंतरवळी  सराटीला सभेस हजर राहणार आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातून  जवळ जवळ ३० ते ३५ हजार मराठा बांधव आरक्षण परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

   प्रत्येक मराठा तरुण आता पेटून उठला असून जर जरांगे पाटील हे प्रकुर्ती साथ देत नसताना सुध्दा , दररोज सलाईन लावून उपचार घेत असताना सुध्दा दररोज पहाटे ३ वाजेपर्यंत सभा घेऊन, मराठा बांधवांना सभेला येण्याचे आवाहन करतात. त्याला प्रतिसाद म्हणून लाखो मराठे सभास्थळी जमा होणार आहेत . या माध्यमातून सरकारला मराठा समाजाची  ताकद दिसणार आहे. तसेच आरक्षणाचा प्रश्न जर नाही सोडवला तर महाराष्ट्रातील ३५टक्के मराठा राजकारण्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. आता नाही तर पुन्हा कधी ही आरक्षण मिळणार नाही हे मराठा समाजाला कळाले आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठे सभेला उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages