येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युवकांची भूमिका ही निर्णायक असणार
आहे- शिवराज मोरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या अध्यक्षेतेखाली सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.
या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवराज मोरे म्हणाले की, येणाऱ्या सोलापुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी बुथ कमिटी कशी असावी बूथ वर काय काय काम करावे. यासंदर्भात सविस्तर माहिती दिली बूथ सक्षम तर पक्ष सक्षम. त्याच प्रमाणे राज्यातील खोके सरकारचा दळभद्री कारभार, केंद्र सरकारचे या दहा वर्षातील अपयश याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागरण अभियान सुरु करावे. मोदी सरकारने जनतेला, युवकांना अनेक खोटे आश्वासने दिली त्यातील एकही पूर्ण करू शकले नाही. असह्य झालेली महागाई आणि बेरोजगारीवरुन लक्ष उडवून मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवुन मुख्य मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवित आहेत. युवकांचे माथे भड़कावित आहेत. भारत हा तरुणांचा देश म्हणुन ओळखला जातो. भारत हा तरूणांचा देश .पण हा तरूण आज बेरोजगारीमुळे निराशेच्या गर्तेत लोटला जात आहे. आपल्या देशात अठरा ते पस्तीस वयोगटातील ६५% तरुण नवमतदार आहे. या तरुणांच्या हाती देश घडविण्याची ताकद आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युवकांची भूमिका ही निर्णायक असणार आहे त्यामुळे युवक काँग्रेसवर महत्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागावे.
यावेळी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक विनोद भोसले,प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर,अनंत म्हेत्रे,प्रवीण जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापूरे,उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला,मागासवर्गीय सेल अध्यक्ष मयूर खरात,एन.एस.यु. आय अध्यक्ष नागेश म्याकल,सुनील सारंगी,धीरज खंदारे ,शरद गुमटे,आकाश जाभंळे,युवराज जाधव,विवेक इंगळे,महेंद्र शिंदे, आशुतोष वाले,शशिकांत शेळके,गणेश म्हेत्रे,अविराज आनंदकर,रोहन साठे,यासार सय्यद,अजिंक्य पाटील,असलम शेख, किरण राठोड,संदेश कांबळे,बबलू जाधव, नासिर शेख,सरफराज शेख,मुबारक मकानदार,निखिल पवार,गणेश वाघमारे, सचिन घारे,चंद्रकांत नाईक,दिनेश डोंगरे,जैनुद्दीन शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment