Hot Posts

6/recent/ticker-posts

फौजदार चावडी पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षका विरोधात पैलवानांचे जोर/बैठका आंदोलन...

 फौजदार चावडी पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षका विरोधात पैलवानांचे जोर/बैठका आंदोलन...

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या मुजोर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्या विरोधात ग्रह विभागाचे अप्पर सचिव, प्रधान सचिव, पोलीस महासंचालक आणि अप्पर पोलीस महासंचाकांकडे फिर्यादी ने तक्रार दाखल केली आहे. संबंधितावर कारवाई न केल्यास फौजदार चावडी पोलीस स्टेशन समोर शेकडो पैलवानांसोबत जोर/बैठका आंदोलन करण्याचा इशारा तक्रारदार पैलवान माऊली हेगडे यांनी दिलाय.

पैलवान माऊली हेगडे यांना 16 सप्टेंबर रोजी दुपारी सोलापुरात एका अज्ञात वाहन धारकाने कारण नसताना कपडे फाडत मारहाण केलेली.याबाबत हेगडे हे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी तक्रार ऐकून घेण्याऐवजी ठाणे अंमलदार कक्षातील एक महिला पोलिसाने आरे रावी ची भाषा करत मदरचोद दिवसभर फाटकी कपडे घालून फिरणार आहे का ? अशी असभ्य भाषा वापरली.त्यानंतर तेथे उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांनी पैलवान माऊली हेगडे यांना डीबी कक्षात जायला सांगितले. यावेळी  तेथे गेल असता तेथे असणारे पोलीस उपनिरीक्षक शंकर धायगुडे यांनी पैलवान माऊली हेगडे यांना अर्वांच्या भाषेत शिवीगाळ केली आणि हीन वागणूक दिली.तू कोण राष्ट्रपती आहेस का ? जा कुठे जायचे आहे तेथे जा.कोन काय करतो बघतो.अशी भाषा वापरात पैलवान माऊली हेगडे यांना अपमानित केले. सामान्य माणसाला पोलिसांकडून मिळणारी हीच का वागणूक ? असा प्रश्न पडत आहे.

पोलिसांकडून मिळणाऱ्या अपमानित वागणुकीमुळे शेकडो तक्रारी दाखल होत आहेत.तर अनेक जण आपले जीवन संपवत आहेत.फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात कायद्याचे रक्षकच गुंड प्रवृतीने वागत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न निर्माण झालाय. संबंधित महिला पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपनिरीक्षक शंकर धायगुडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा 16 ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ 50 ते 100 पैलवानांना सोबत घेवून फौजदार चावडी पोलीस स्टेशन समोर जोर/बैठका आंदोलन करण्यात येईल. असा इशारा पैलवान माऊली हेगडे यांनी दिला 


(अधिक माहितीसाठी माऊली हेगडे - संपर्क - 9011616115 )

Reactions

Post a Comment

0 Comments