ग्रामसुरक्षा दलाच्या त्या फोन मुळे एटीएम चोरणारी टोळी माढा पोलिसांनी
केली गजाआड
जिल्हा पोलिस अधिक्षकांनी माढा पोलिसांसह नागरिकांचे केले कौतुक
माढा (कटूसत्य वृत्त):- ग्रामसुरक्षा दलाच्या त्या एका फोन मुळे नागरीक सतर्क झाले आणी माढा पोलिसांनी यंत्रणा तत्परतेने हालवल्यामुळे राशन(जि.अहमदनगर ता.कर्जत) येथून पिक अप वाहनातून पळवुन आणलेली एटीएम मशिन सह ती चोरट्यांची टोळी माढा पोलिसांनी गजाआड केली आहे.महादेव सरगर,बाळासाहेब चौगुले,अविनाश कारंडे तिघे रा.उंडेगाव ता.बार्शी,सतिश खांडेकर रा.वडनेर ता.परांडा अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.३ लाख ११ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
राशन गावातुन हिताची कंपनीचे एटीएम मशिन मंगळवारी पहाटे पिक अप वाहनात घालुन ते पळवुन आणण्यात आले होते.ते एटीएम घेऊन एटीएम चोरणारी टोळी माढा पोलिस स्टेशन च्या हद्दीतील पिक अप वाहनासह ती चोरट्याची टोळी पाचवा मैल लोंढेवाडी गावच्या हद्दीत एटीएम मशिन उचकटून गॅस कटरने कट करने कट करुन पैसे काढत असताना एका प्रत्यक्ष दर्शीने पाहिले.ही घटना समजताच माढा पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय घोळवे यांनी पोलिस निरिक्षक बी.एस.खणदाळे यांचेसमवेत घटनास्थळी पोहचताच पिक अप सह आरोपींनी पोबारा केला.पोलिसांनी ही त्यांच्या गाडी मागे पाठलाग केला.पिक अप वाकाव रेल्वे स्टेशन च्या नाल्या खाली चिखलात अडकले.आणी पैश्याची बॅग घेऊन त्यांनी ऊसाच्या शेतातुन पलायन केले.तोपर्यत माढा पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलामार्फत फोन करुन खैराव,जामगाव,केवड भागातील नागरिकांना सतर्क केले.यामुळे खैराव मध्ये पोलिस पाटील बाळासाहेब पाटील यांनी एका आरोपीस पकडले.दुसरा आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाला.तर केवड मधील प्रशांत पाटील,सतिश लटके,शंकर जाधव,राहुल धर्मे यांचेसह अन्य नागरिकांनी हॉटेल निसर्ग जवळ २ जणांना तर जामगाव च्या हद्दीत १ आरोपीला पकडुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.आरोपींकडून रोकड व एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन अन्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन माढा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती पत्रकारांना दिली.आरोपीना पकडुन देणाऱ्या नागरिकांचे व सतर्कता दाखवणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल संजय घोळवे यांचेसह पोलिस निरिक्षक बि.एस.खणदाळे यांचे त्यांनी कौतुक केले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,बार्शी चे उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल,माढ्याचे पोलिस निरिक्षक बी.एस.खणदाळे,कर्जत चे पोलिस निरिक्षक घनशाम बळप आदी उपस्थित होते.या घटनेतील मुद्देमाल व आरोपी कर्जत पोलिसांना वर्ग करण्यात आलेत.

0 Comments