Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या तालुकाध्यक्षपदी ओंकार चव्हाण

 पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या तालुकाध्यक्षपदी ओंकार

 चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली नियुक्ती! पंढरपूरातील

 पत्रकारांनी ओंकार चव्हाण यांचा केला सत्कार



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया फ्रंट (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्षपदी ओंकार चव्हाण यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे ओंकार चव्हाण यांचा ठिकठिकाणी सत्कार होत असून, पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकारांनी ओंकार चव्हाण यांचा सत्कार केल्याने पंढरपूर शहरात चर्चेला उधाण आले आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या ४ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याबरोबरच तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करून, त्यात पंढरपूरच्या तालुकाध्यक्षपदी ओंकार चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात अजित पवार गटाला झळाळी मिळाली आहे.
           राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ओंकार चव्हाण यांचा सत्कार पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकारांनी केला असुन, त्यातही प्रामुख्याने त्यांचा सत्कार H.P.N. न्यूज चॅनलचे संपादक नागेश सुतार यांच्या हस्ते करण्यात आला असून, यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार सचिन कसबे, ज्येष्ठ पत्रकार अभिराज उबाळे, ज्येष्ठ पत्रकार जाकीर नदाफ, ज्येष्ठ कॅमेरामन राजू मिसाळ, शामसुंदर चव्हाण डॉक्टर करीम साहेब, माऊली सुगंधी, अविनाश शेटे, आदि उपस्थित होते.
        ओंकार चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे अर्थातच युवा चेहर्‍यामुळे पंढरपूर तालुक्यात अजित पवार गटाला पोषक वातावरण तयार झाले आहे, झळाळी प्राप्त झाली आहे, हे नक्की!

Reactions

Post a Comment

0 Comments