मुली समोर वडिलांना शिविगाळ केल्या प्रकरणी माढा पोलिसांत ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरातील एका वडिलाला त्यांच्या मुलीसमोर हुज्जत घालुन शिविगाळ करुन त्या मुलीच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलून बिभस्त चाळे केल्याची घटना माढ्यातील सोलापूर रोडवरील एका दवाखान्यासमोर ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.संबधित मुलीने माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार गणेश साळुंखे व अन्य तिघांविरुद्ध ३४१ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबधित ४ संशयितांनी मुलीसमोर वडिलांना लज्जा वाटेल असे बोलल्याने या गुन्हाची नोंद झाली आहे.
.jpg)
0 Comments