Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यू इंग्लिश उंडेगाव विद्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न झाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

 न्यू इंग्लिश उंडेगाव विद्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न झाली

 राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती


वैराग (कटूसत्य वृत्त):- रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव या विद्यालयात विविध उपक्रम घेऊन साजरी केली महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती. जयंतीच्या पूर्वसंध्येला शाळा परिसरात एक तारीख एक तास श्रमदान हा उपक्रम घेऊन शालेय विद्यार्थी,पालक व शिक्षक यांनी शाळा परिसर स्वच्छता केली व नंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ यांच्या समवेत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात  आले.
     आज सकाळी दोन्ही महान विभूतींचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे करून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले तर शिक्षक मनोगतात अनिल डोईफोडे यांनी महात्मा गांधी यांच्याकडून सत्य,अहिंसा प्रेम व लाल बहादूर शास्त्री यांच्याकडून कणखर बाणा हे गुण अंगिकरावेत असे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार डूरे पाटील यांनी आपल्या या दोन महान नेत्यांचा जीवन संघर्ष सांगून त्यांच्या विचारावर आपले जीवन मार्गक्रमण करावे असे नमूद केले.
   या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप पाटील,मनोज पालकर,रमेश भोजने,काकासाहेब ठाणेकर,विनोद पाटील ,मनीषा मस्तुद व शिक्षण प्रेमी नागरिक बाबासाहेब पठाण,नागनाथ बरबडे,देशमुख नाना व सर्व सेवक विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता 7 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केले होते.कु.वैभवी भोजने हिने सूत्रसंचालन केले तर आभार कु.सुहाना शेख हिने मानले शेवटी उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्याना क्रायकर्माच्या अध्यक्षांनी रोख बक्षीस देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments