Hot Posts

6/recent/ticker-posts

5 ऑक्टोबरला पुण्यात राज्यस्तरीय व्यापारी परिषद..!

 5 ऑक्टोबरला पुण्यात राज्यस्तरीय व्यापारी परिषद..!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- व्यापारी क्षेत्रातील नवे बदल, व्यापाऱ्यांची विविध प्रश्न आणि मागण्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी स्वारगेट पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता भव्य राज्यस्तरीय व्यापारी परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती भुसार  आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चिक्कळी म्हणाले की, " या राज्यस्तरीय व्यापारी परिषदेसाठी राज्यातून सुमारे 3000 व्यापारी या परिषदेला उपस्थित राहणार असून या परिषदेसाठी खास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाचे अध्यक्ष सुनील सिंघी आणि लोकप्रिय स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पारंपरिक व्यापार टिकवणे, तो वाढविणे आणि नव्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे ही राज्यस्तरीय व्यापार परिषदेच्या आयोजना पाठीमागचा प्रमुख हेतू आणि उद्दिष्ट असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्र मुंबई, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड मुंबई, द ग्रीन,  राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट  असोसिएशन मुंबई आणि दि पुना मर्चंट चेंबरच्या सहयोगाने महाराष्ट्राचे व्यापारी कृती समितीच्या तर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात आणि इतर ठिकाणी व्यवसाय करणारे खाद्यांनाचे व्यापारी परिषदेत सहभागी होणार आहेत.  प्रथम उद्घाटन सत्र आणि  भोसल्यानंतर खुले सत्र व समारोप अशा दोन सत्रांमध्ये ही व्यापारी परिषद होणार असून या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सर्व खाद्यान्न वस्तूचा व्यापार करणाऱ्या संस्थांचे सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी उपाध्यक्ष अशोक संकलेचा यांनी दिली. या परिषदेमध्ये व्यापार विषयक विविध कायद्याची तसेच व्यापार वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग याबाबत तज्ञाकडून माहिती दिली जाणार असून "एक देश एक कर" हे धोरण स्वीकारून जीएसटीच्या अंमलबजावणी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या खाद्यानावरही जीएसटी लागू करण्यात आली आहे. तरीसुद्धा बाजार समितीमध्ये सेटच्या माध्यमातून कर आकारला जात आहे त्याचा व्यापाऱ्यावर फार मोठा परिणाम होत आहे. सध्याच्या परिस्थितीत अडचणीचा ठरणारा एपीएमसी कायद्यामध्ये बदल करण्यात यावेत एफ एस एस ए आय कायद्यामध्ये सुधारणा करावी.  आधी मागण्यांवर  या परिषदेत चर्चा होणार असून सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी या व्यापारी परिषदेला सर्व व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन व्यापाऱ्याची शिखर संघटना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे ललित गांधी  यांच्या वतीने भुसार अडक व्यापारी संघ च्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी मार्केट यार्जातील सर्व व्यवहार बंद ठेवून पुणे येथे होणाऱ्या राजव्यापी व्यापारी परिषदेस सर्वांनी हजर राहण्याची आव्हान अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी शेवटी केले. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अशोक संकलेचा,  सेक्रेटरी वैभव बरबडे ,खजिनदार गुरु शांत ढंगे, तुकाराम काळे ,प्रभाकर विभूते,  संगमेश्वर रघुजी,  बसवेश्वर इटकळे,  विनय दुलंगे,  भरतेश दोशी,गिरीश भिमपुरे आधी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments