Hot Posts

6/recent/ticker-posts

खंडोबाचीवाडी येथे आयुष्यमान भव मोहिमे मोहिमेअंतर्गत आयुष्यमान सभा आयोजित

 खंडोबाचीवाडी येथे आयुष्यमान भव मोहिमे मोहिमेअंतर्गत आयुष्यमान सभा आयोजित


खंडोबाचीवाडी (कटूसत्य वृत्त):- आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खंडोबाचीवाडी येथे आयुष्यमान भव या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सरपंच सौ माधुरी भाऊराव इंगळे यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ABHA कार्ड नोंदणी, TB, Lepracy, Non-communicable disease, communicable disease, High risk factors of NCD, Nutritious Diet, Mental health, health facility, teleconsultation, etc या सर्व विषयांची आरोग्यवर्धिनी केंद्राच्या प्रमुखा व समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर नौशाद शेख मॅडम यांनी उपस्थित सर्व नागरिकांना माहिती सांगितली व सहकार्य करावे ही विनंती केली, सभेस महावीर अरुण शिंदे सचिन दादाराव गुंड, किसन तुकाराम भोसले, नानासाहेब हिरालाल शिंदे,  लहू दगडू शिंदे, जि. प. प्राथमिक शाळा खंडोबाचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, सर्व आरोग्य सेविका, सर्व अंगणवाडी सेविका व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments