कवी युवराज जगताप
"जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्काराने सन्मानित
,बार्शी (कटूसत्य वृत्त):- ओन्ली समाजसेवी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था बार्शी आयोजित "जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्कार वितरण कार्यक्रमात कवी युवराज जगताप काटेगाव यांना पोलीस अधीक्षक सोलापूर मा.श्री.शिरीष सरदेशपांडे साहेब यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,शाल, डिजिटल सन्मानपत्र ,मनाचा फेटा असे होते.पुरस्कार प्रदान सोहळा माऊली लॉन्स ,बार्शी येथे संपन्न झाला.
सदरच्या कार्यक्रमास एफ. आर. शेख (तहसीलदार बार्शी), बाळासाहेब चव्हाण साहेब (मुख्याधिकारी न. पा. बार्शी) अनिल बनसोडे (प्रशासनाधिकारी न.पा. बार्शी), संजय पाटील साहेब (पर्यवेक्षक न.पा.शि. मं. बार्शी), अजितदादा कुंकलोळ (राज्य संघटक व्हॉइस ऑफ इंडिया) अमृत नाना राऊत (माऊली लॉन्सचे मालक) शशांक गुगळे (युवा उद्योजक बार्शी) सचिन वायकुळे ( स्मार्ट अकॅडमी बार्शी) सतीश अंधारे (साई डेव्हलपर्स बार्शी)आदी मान्यवर उपस्थित होते.
युवराज जगताप हे काव्यप्रेमी शिक्षक मंच चे पुणे विभागाचे विभागीय उपाध्यक्ष असून विविध वर्तमानपत्र- दैनिक डहाणू मित्र पालघर ठाणे,दैनिक युवा छत्रपती लातूर,दैनिक दिव्य मराठी,दैनिक संचार,दैनिक कटुसत्य ,साप्ताहिक मुखेड लोकसंकेत नांदेड,साप्ताहिक सायबर क्राईम औरंगाबाद,मासिक चपराक पुणे तसेच प्रातिनिधिक कविता संग्रह,दिवाळी अंक,यातून कविता व चारोळ्या प्रसिद्ध झालेले असून उस्मानाबाद fm वर देखील युवावाणी या सदरात कार्यक्रम झालेला आहे.साहित्य सेवेकरिता २राष्ट्रीय पुरस्कार व ४ राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून ते गेली२४ वर्षांपासून दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून आजपर्यंत च्या त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती ,संभाजी ब्रिगेड बार्शी या दोन्ही संघटनेच्या वतीने तसेच न.पा. शिक्षक मंडळाच्या वतीने असे ३ आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले असून ओन्ली समाजसेवी संस्थेकडून मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत
0 Comments