Hot Posts

6/recent/ticker-posts

*सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी पंढरपूर च्या खेळाडूंची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड*

 *सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी पंढरपूर च्या खेळाडूंची राज्यस्तरीय नेटबॉल

 स्पर्धेसाठी निवड*


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  6 ते 8 ऑक्टोंबर 2023 दरम्यान नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सबजूनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी सोलापूर संघात सिंहगड पब्लिक स्कूल मधील खालील खेळाडूंची निवड झाली.  मुले  रोहित गलांडे, देवकुमार मखवाना, म. सकिब शेख, ईशान आठवले, श्लोक कदम, मुली प्राची थिठे, ईश्वरी काळे, दर्शना तेली, सीमंतिनी बिराजदार, वसुंधरा अवधूतराव या मुलामुलींची निवड झाली.  या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक  एम एन नवले सर, कॅम्पस डायरेक्टर डॉ कैलास करांडे सर, शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वरील यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
      वरील खेळाडूंना  क्रीडा शिक्षक स्वाती म्यागेरी, कुलदीप कोरडे , मल्हारी एकतपुरे व  आर्यन चव्हाण यांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments