वारकरी संप्रदायातील मेरुमणी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 26, 2023

वारकरी संप्रदायातील मेरुमणी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे निधन

 वारकरी संप्रदायातील मेरुमणी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे निधन


        पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार, संप्रदायातील मेरुमणी ह.भ.प. आदरणीय बाबामहाराज सातारकर यांचे आज रोजी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणुन जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात.नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.  बाबा महाराज सातारकर उर्फ  नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातार्‍यात झाला. पुढे त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली.    त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.  १९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा म्हणजेच फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली.  डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात.  बाबामहाराज यांची प्रवचने - किर्तने राज्यातील गावा-गावा पर्यंत पोहचली होती. किर्तनकार म्हणून त्यांचा मोठा नावलौकीक होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages