Hot Posts

6/recent/ticker-posts

*आर्या कॉलेज ऑफ फार्मसीची मार्स हॉस्पीटल ला शैक्षणिक भेट* ,

आर्या कॉलेज ऑफ फार्मसीची मार्स हॉस्पीटल ला शैक्षणिक भेट


 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील विध्यार्थ्यांनी मार्स हॉस्पीटल टेंभुर्णी ला शैक्षणिक भेट दिली.  हॉस्पीटल व्हिजिट हा फार्मसी अभ्यासक्रमाचा भाग आहे. हॉस्पीटल मध्ये विद्यार्थांना विविध विभागांची तसेच उपकरणांची माहीती मिळाली. सोनोग्राफी, आय.सी.यु. विभाग, शस्त्रक्रिया विभाग, डिजीटल एक्स-रे विभाग, सिटीस्कॅन विभाग, ऑपरेशन थिएटर, हॉस्पीटल फार्मसी, ओपीडी, जनरल वार्ड, स्पेशल वार्ड आदी गोष्टी प्रत्यक्ष पहायला मिळाल्या. डॉ. अमोल माने व डॉ. संजय बनसोडे यांनी विदयार्थांना सखोल मार्गदर्शन केले. हॉस्पीटलमध्ये मिळालेल्या माहीतीचा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यास मदत होणार आहे. या भेटीदरम्यान महाविदयालयाचे प्राचार्य धनंजय चव्हाण, प्रा.तुषार कन्हेरे, प्रा.संजीवनी कुटे, अमृता कसबे, आयेशा शेख व सर्व विदयार्थी उपस्थीत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments