वडाचीवाडीत घराचे कुलूप तोडुन भरदुपारी चोरी,२ लाख ६८ हजारांचे
सोन्याचे दागिने व रोख रक्कम केली लंपास
माढा (कटूसत्य वृत्त):-माढा पोलिस स्टेशन हद्दीतील वडाचीवाडी(त.म) गावात घराचे कुलूप तोडून भरदुपारी २ लाख ६८ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे.प्रियांका विठ्ठल भराटे (रा.वडाचीवाडी त.म) यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार अज्ञात तिघा चोरट्यांविरुध्द माढा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.२४ ऑक्टोबर २०२३ रोडी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे.प्रियांका भराटे या घराला कुलूप लावुन शेतात गेलेल्या होत्या.घरी कुणी नसल्याचा डाव साधुन तिघा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी पेटीतील सोने चांदीचे १ लाख ८८ हजारांचे दागिने व ८० हजार रोकड असा २ लाख ६८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.भरदुपारी घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरातील गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.माढा पोलिसांनी सखोल तपास करुन चोरट्याचा शोध घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
0 Comments