Hot Posts

6/recent/ticker-posts

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन 

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जिल्ह्यातील निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी   हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र बँकेमार्फत दि. 30 नोव्हेबर 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स. र. मोमीन यांनी केले आहे.

                 जिल्हा कोषागार कार्यालय सोलापूर येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेकडे असलेल्या यादीमध्ये त्यांचे नावासमोर  स्वाक्षरीकरून हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र  सादर करावे .

            तसेच निवृत्तीवेतनधारक जीवन प्रमाण  (Jeevan Pramaan) या प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पध्दीतीने देखील त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतात.   ज्या निवृत्तीवेतन धारकांचे  हयातीचे दाखले वेळेत प्राप्त होणार नाहीत. त्यांचे माहे डिसेंबर 2023 व त्यापूढील निवृत्तीवेतनाबाबत प्रचलित शासन नियमानुसार कार्यवाही केली जाईल. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी व कुंटुबनिवृत्तीवेतनधारकांनी  हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र  वेळेत सादर करावे असे, आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स. र. मोमीन यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments