पोखरापूर मध्ये मराठा कुणबी समाजाचा कॅन्डल मार्च : जरांगे- पाटील यांना समर्थन
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रभर वातावरण तापू लागले असतानाच पोखरापूर ग्रामस्थानी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा कुणबी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत सकल मराठा बांधवांनी गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला.या मोर्चामध्ये बायका-मुलांसह मराठा युवकांनी पुढाकार घेतला होता.
मराठा समाज हा कुणबी असल्याचे हजारों पुरावे आरक्षण समितींच्या हाती लागले आहेत. तरीही समितीला दोन महिने मुदतवाढ देवून मराठा कुणबी समाजाची सरकार दिशाभूल करीत आहे. ओबीसी प्रवर्गासाठी स्थापित मंडळ आयोगाने ज्या समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला आहे, त्याच्या मुळ शिफारसी प्रसिद्ध कराव्यात. मंडळ आयोगाने ओबीसी साठी किती टक्के आरक्षण दिले आहे ते सरकारने जाहीर करावे. त्यामध्ये मराठा कुणबी या समाजाची नोंद असताना आतापर्यंत डावलले आहे. कोणताही डेटा जमा न करता, आंदोलने न करता ओबीसी टक्केवारीत वाढ करण्यात आली आहे. हे मराठा कुणबी समाजाला अन्यायकारक आहे असे मत शिवाजीराव दळवे यांनी व्यक्त केले. माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे यांनी कंँन्डल मार्चमध्ये "मराठा कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे" मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आगे बढो," या घोषणा दिल्या. आपले आंदोलन हे शांततापूर्ण झाले पाहिजे असे अशी विनंती यावेळी उन्हाळे यांनी केली. यावेळी सचिन आगलावे यांनी विचार व्यक्त केले.मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी पोखरापूरचे ह.भ.प. शिवाजी भोसले महाराज यांनी विठ्ठल भजनी मंडळासह टाळ मृदंगांसह वाजत गाजत मराठा समाजाच्या आरक्षण पाठिंबा दिला.हा कंँन्डल मार्च शांततापूर्ण काढल्याबद्दल सर्वांचे आभार ह. भ. प. शिवाजी भोसले महाराज यांनी व्यक्त केले.
0 Comments