मराठा आरक्षणासाठी आ.मानेंनी केली राज्यपालांकडे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी...!
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सध्या राज्यातच नव्हे तर देशात मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उसळी मारत असताना आमदार या नात्याने मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने आणि त्यांच्या समवेत राज्यातील इतर दहा आमदारांनी मुंबई या ठिकाणी राज्यपाल रमेश बेैस यांची भेट घेऊन मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे. आणि त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे असे मागणी लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
सध्या विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय हा प्रश्न पुढे जाणार नाही. चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही त्यामुळे राज्यपालांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार यशवंत माने यांच्यासह राज्यातील 10 आमदारांनी केले असून त्यासाठी त्यांनी मंत्र्याला जवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर ठिया आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले आहे.
सध्या राज्यामध्ये मराठा समाजातील किंवा इतर समाजातील आमदार आणि खासदार तसेच राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोष पत्करावा लागत असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवण्याची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात गावागावात कॅण्डल मोर्चा काढून व विविध कायदेशीर आंदोलनद्वारे केली जात आहे.
सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवून मराठ्यांना न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याची मागणीही आ.यशवंत माने यांनी केली आहे.
0 Comments