पोखरापूर येथे मराठा आरक्षणासाठी युवकाचे उपोषण सुरू.
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत पोखरापूर येथील राजेंद्र अभिमान बाबर या युवकाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सकल मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीचे लेखी निवेदन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना मोहोळचे तहसीलदार यांच्यामार्फत देऊन "मराठा कुणबी एकच असल्याचे हजारों पुरावे सरकारकडे समितीने सादर केले आहेत. सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे. अशी मागणी राजेंद्र बाबर यांनी निवेदनात केली आहे. उपोषणकर्ते राजेंद्र बाबर यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो युवकांनी उपोषणस्थळी हजेरी लावली आहे. यावेळी निवेदन सादर करताना , मोहोळचे तहसीलदार म्हणाले की,सरकार सकारात्मक विचार करीत आहे, तुमच्या पत्रातील भावना मा. मुख्यमंत्री यांना कळविण्यात येतील असे मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितले.
0 Comments