अखेर मोहोळ शहर बंद करण्याचा निर्णय...
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी उद्या दिनांक 31/10/2023 मंगळवार रोजी मोहोळ शहर दिवसभर कडकडीत बंद राहील. दुपारनंतर कोणी दुकान उघडल्यास त्याचे नुकसान झाल्यास सर्वस्वी स्वतः दुकानदार जबाबदार असेल.तसेच उद्याच्या दिवसांमध्ये मोहोळ शहरात जेवढे राजकीय पक्षांचे होर्डिंग असतील ते संबंधित कार्यकर्त्यांनी काढून टाकावेत अन्यथा सर्व बॅनर वर काळे फासले जाईल. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांचे होर्डिंग मोहोळ मध्ये लावू नयेत
टीप- उद्या सकाळी ९.३०वाजता सर्व मराठ्यांनी शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी छञपती शिवाजी महाराज चौक मोहोळ येथे उपस्थीत राहावे तेथून आपण सर्व मराठा बांधव तहसील कार्यालय,मोहोळ येथे तहसिलदार यांना निवेदन देण्यासाठी जातील.
व्यापार्यांचा पुळका असनार्यानों समाजाच्या भावना तीव्र आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी
धन्यवाद
सकल मराठा समाज
वरील आशयाचा मजकूर सोशल मिडीयावर फिरत आहे. तो मजकूर बरोबर आहे का हे तपासून घेण्यासाठी सकल मराठा समाजाचे मोहोळचे समन्वयक संतोष गायकवाड यांना संपर्क साधला असता त्याला त्यांनी दुजोरा देत म्हणाले की, आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र बंद होत होते परंतू मोहोळ शहर कधीच बंद राहील नाही. मात्र मराठा आरक्षणासाठी तरूणानी बंदची हाक दिलेली असल्याने आम्हीही बंद मध्ये सहभागी होणार आहोत. उद्याचा बंद सांततेत करण्यात यावा असेही आवाहन संतोष गायकवाड यांनी शेवटी केले.
0 Comments