52 ठिकाणी 9256 अधिकारी,लोकप्रतिनिधी, श्री सदस्य व कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहीममध्ये घेतला सहभाग... 82 घंटागाड्यासह 145 टन कचरा उचलण्यात आला. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 2, 2023

52 ठिकाणी 9256 अधिकारी,लोकप्रतिनिधी, श्री सदस्य व कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहीममध्ये घेतला सहभाग... 82 घंटागाड्यासह 145 टन कचरा उचलण्यात आला.

 52 ठिकाणी 9256 अधिकारी,लोकप्रतिनिधी, श्री सदस्य व कर्मचाऱ्यांसह 

स्वच्छता मोहीममध्ये घेतला सहभाग... 

 82 घंटागाड्यासह 145 टन कचरा उचलण्यात आला.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतुन एक साथ एक घंटे स्वच्छता के लिए श्रमदान हेतु स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित  साधून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा सुरू असून आज सकाळी 10:00 वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली - उगले यांच्या हस्ते कंबर तलाव येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक वाहन नागनाथ मेंडगुळे, अनिल चाराटे आदी मान्यवर उपस्थित होते.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एसटी स्टँड,रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे,सार्वजनिक ठिकाणी तसेच  प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आले असून प्रत्येक वार्डामध्ये स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच अभियानानंतर कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यासह घंटागाड्याचे नियोजन करण्यात आले आहे.यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत  पूर्व मध्यमंडल भागात अशोक चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. हा परिसर स्वच्छ करून महात्मा गांधीजी यांना स्वछांजली अर्पण केली तसेच आमदार तथा बाजार समिती सभापती श्री. विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री सिध्देश्वर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या  वतीने सेवा पंधरवडा  17 ते 2 ऑक्टोबर अंतर्गत स्वच्छता अभियान बाजार समिती मार्कटयार्ड परिसरात राबविण्यात आला. येळेगाव येथे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचबरोबर पोलीस आयुक्त परिसरामध्ये स्वच्छता मोहीम घेण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने,मनपा उपायुक्त आशिष लोकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे  त्यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणचे परिसर स्वच्छता केली. यावेळी तुळजापूर रोड येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली. वरील ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री नरेंद्रजी काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम , माजी सभागृह नेते संजय कोळी,राजकुमार पाटील,पांडुरंग काका दिद्दी, नागेश सरगम, सुनील गौडगाव, गिरीश बत्तुल, महेश बनसोडे, आनंद बिर्रू आदी नगरसेवक, उपसभापती श्रीशैल नरोळे बसवराज इटकळे सुरेश चिकळी वैभव बरबडे प्रभाकर विभुते महालिंगप्पा परमशेट्टी प्रकाश हत्ती श्रीशैल अंबारे जगदीश व्होड्रांव योगेश हिरेमठ फौज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या स्वच्छते मोहिमेमध्ये 52  ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आले असून 145 टन कचरा उचलण्यात आला. यामध्ये 9 हजार 256 मनपा अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच माजी नगरसेवक माजी पदाधिकारी व धर्म अधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages