जिल्ह्यातील 19 महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 6, 2023

जिल्ह्यातील 19 महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचाऱ्यांना पदोन्नती

 जिल्ह्यातील 19  महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचाऱ्यांना  पदोन्नती



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील  महसूल विभागातील 19 महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचारी यांची  अव्वल कारकून व  मंडळ अधिकारी पदी दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पदोन्नतीचे आदेश काढले आहेत.

सदर पदोन्नतीमुळे महसूल विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातील रिक्त जागा भरल्या गेल्याने महसूल विभागाच्या क्षेत्रीय व तहसिल स्तरावरील कामकाजावर चांगला परिणाम होवून शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

यावेळी महसूल सहायक व तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages