मोहोळ तालुक्यातील विविध विकास कामांसाठी अडीच कोटी रुपयांची मंजुरी
शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांची माहिती
कुरुल (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील विविध गावच्या विकासकामासाठी ग्रामविकास व पंचायत राज च्या अंतर्गत २ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला असून यामध्ये पेनूर येथील ग्रामपंचायत शेजारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी ८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे पेनूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांची काळजी घेणारे कुटुंबप्रमुख आहेत. शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांना नेहमीच ते प्राधान्य देतात. याच संकल्पनेतून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखांना निधी देण्याची योजना आखली.
यामुळे मोहोळ तालुक्यातील पेनूर गावासाठी सुमारे एक कोटी रुपयांचे वाड्या- वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच मोहोळ तालुक्यातील नांदगाव, ढोकबाबुळगाव, रामहिंगणी,भांबेवाडी, वडवळ, सय्यद वरवडे आदी भागातील रस्ते कॉंक्रिटीकरण, रस्ते खडीकरण, भूमिगत गटार, रस्ता मजबुतीकरण यांसारखी विकास कामे केली जाणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एक कोटी पन्नास लाख रुपये तर जिल्हा परिषदेच्या फंडातून तब्बल एक कोटी असे एकूण अडीच कोटींच्या विकास कामाची मंजुरी शिवसेना नेते चरणराज चवरे यांनी मिळवून घेतली आहे त्यामुळे स्वातंत्र्य काळापासून रस्ता नसणाऱ्या मोहोळ तालुक्यातील गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे.
निधी पळवणाऱ्या लोकप्रतिनिधीला येत्या काळात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
२५-१५ ग्राम विकास योजनेमधून २ कोटी ५० लाख रुपये मोहोळ तालुक्याला देऊन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळाला तसेच मोहोळ तालुक्यातील शिवसेनिकांना मोठ्या प्रमाणात ताकद देण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये मोहोळ तालुक्यात सर्वसामान्य जनतेसाठी पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मोहोळ तालुक्यामधील ऊस उत्पादक शेतकरी, शाळेला जाणाऱ्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रात्री अहो रात्री दवाखान्यात जरी जायचं म्हटलं तर वाडीवस्तीवरच्या सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास या सर्व गोष्टीला मोहोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी कारणीभूत आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेल्या एक महिन्याखाली दीड कोटी आलेला निधी मोहोळचे विद्यमान आमदार यांनी पळवण्याचे काम केले आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मोहोळ तालुक्यातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
-चरणराज चवरे
शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर
.png)
0 Comments