शेतकऱ्यांनी व्हिके (VK) नंबरचे प्रामाणिकरण करून घेतल्यानंतरच थेट
बँक खात्यावर मदत मिळेल
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- नैसर्गिक आपत्तीने व सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देऊन संबंधित तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई -पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्याकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. तहसीलदार यांनी शेतकऱ्यांची व्हीके (VK)लिस्ट ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध केली आहे. या यादीतील VK नंबर घेऊन शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन प्रामाणिकरण करून घ्यावे. त्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार यांनी दिली आहे.
तसेच शासनामार्फत आत्तापर्यंत केलेल्या पेमेंट मध्ये आधार बँक खातेशी लिंक नसणे, इन ॲक्टिव्ह आधार या कारणामुळे पेमेंट रिजेक्ट झालेले आहे, अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक करणे व आधार केंद्रावर जाऊन आधार ॲक्टिव केल्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत थेट बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment