लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कृषीतील उच्चशिक्षणाच्या
संधी याविषयी मार्गदर्शन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन आणि विकास संस्था संचालित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थीनी कुलांगी अम्रृता यांचे कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी तयारी कशी करावी, विद्यार्थ्यांनी त्यासाठी कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात, तसेच या परिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी कोणकोणत्या शिष्यवृत्ती मिळवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषदेमार्फत व राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेमार्फत घेण्यात येणार्या एम. एस. सी. कृषी व पी. एच. डी. कृषी या परिक्षांविषयी, त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक तयारीविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. महाजन एस आर यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. आदलिंगे पी.एम., प्रा. सरकाळे ए. पी., प्रा. उंबरे पी. एच., प्रा. बडेकर एस. एस.,प्रा. बंदसोडे सी. आर., प्रा. खुणे एन. एस. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment