खा डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते म्हैसूर- पंढरपुर गोलघुमट
एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून पंढरपुर च्या दिशेने रवाना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाविकाच्या आणि प्रवाश्यांच्या मागणीला प्रतिसाद देत दिनांक 05.09.2023 ला गाड़ी क्र. 16535 मैसूर – सोलापुर गोलघुमट एक्सप्रेस गाडीचा विस्तार पंढरपुर पर्यंत करण्यात आला. हया गाड़ीमुळे दक्षिण भारतातून विठ्ठल-रुक्माई मंदिराच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांच्या फायद्या झाला. गाडीला माननीय खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी हिरवा झेंडा दाखऊन पंढरपुरच्या दिशेने रवाना केले तर पंढरपुरहुन गाड़ी क्र. 16535 पंढरपुर – मैसूर हया गाडीला माननीय आमदार समाधान आवताडे यांनी हिरवा झेंडा दाखऊन मैसूरच्या दिशेने रवाना केले. याप्रसंगी सोलापुर मध्ये, मध्य रेलवेचे विभागीय रेलवे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले तर पंढरपुर मध्ये वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, करडी सरपंच प्रणव परिचारक, पंढरपुर चे सामाजिक कार्यकर्ते दिपक चंदनशिवे, डॉ. सुभाष कदम, काशिनाथ थिटे, बादल ठाकूर, प्रा. चांगदेव कांबळे, नगरसेवक परदेशी, दादा फत्तेपूरकर, संजय सातपुते राहूल चंदनशिवे, दत्ता शिंदे, दिलीप कोरके उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment