गुळपोळी विविध कार्यकारी सेवा सह.संस्थेच्या निवडणूकीवर सभासदांनी,
मतदार यादीची होळी करून मतदानावर बहिष्कार टाकला
गुळपोळी (कटूसत्य वृत्त): - शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली गुळपोळी विविध कार्यकारी सेवा सह संस्था.मर्यादित गुळपोळी या संस्थेची मतदार यादी तत्कालीन सचिव सतीश मच्छिंद्र चिकणे,सोमनाथ संदिपान ठाकरे प्रफुल्ल बिभीषण शिंदे यांनी पात्र सभासदांना मतदार यादीत समाविष्ट केले नाही व जे सभासद मतदार यादीत पात्र होत नाहीत त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत म्हणुन व गुळपोळी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी व पात्र सभासद यांना समाविष्ट करण्यात यावे या कारणासाठी मतदार यादीची होळी करून मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला यावेळी गुळपोळी सोसायटीतील सभासद सूर्यकांत चिकणे, भैरवनाथ बारवकर, सोमनाथ बारवकर, भिमराव मचाले, अशोक चिकणे, शिवाजी काळे, बापूराव काळे,रामकृष्ण चिकणे, ओंकार पाटील, हुसेन शेख, परशुराम पाटील, शहाजी चिकणे, रमेश चौधरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment