माजी आमदार राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांच्या प्रयत्नातून मोहोळ शहराला 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

माजी आमदार राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांच्या प्रयत्नातून मोहोळ शहराला 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर

 माजी आमदार राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांच्या प्रयत्नातून

 मोहोळ शहराला 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर

नगरसेवक मुस्ताक शेख, दत्ता अण्णा खवळे यांची माहिती




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरूवातीपासूनच मोहोळ शहराचे विकास मार्गदर्शक तथा माजी आमदार राजन पाटील हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आमदार यशवंत माने यांनी देखील तालुक्याचे शहर असलेल्या मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी एकच दक्ष लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत पोटतिडकीने कर्तव्यदक्षता बजावत ठोस पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत तात्या माने यांनी अथक पाठपुरावा करून आपल्या मोहोळ शहरासाठी शासनाच्या विविध योजनेतून तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे अशी माहिती मोहोळचे राष्ट्रवादीचे मा नगरसेवक मुस्ताक शेख आणि दत्ता अण्णा खवळे यांनी दैनिक कटूसत्यशी बोलताना दिली.
मोहोळ नगरपरिषदेच्या राष्ट्रवादीच्या सत्ता कालावधीत आम्ही सर्व नगरसेवकांनी विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे करत असताना मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत तात्या माने यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याची कृतज्ञताही यावेळी मुस्ताक शेख आणि दत्ता आण्णा खवळे  यांनी व्यक्त केली. यापूर्वी देखील आमदार यशवंत तात्या माने यांनी मोहोळ नगरपरिषदेसाठी अजित दादांकडे पाठपुरावा करून तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी खेचून आणला होता. आता देखील 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्यामुळे मोहोळ शहरांमध्ये राष्ट्रवादी हा सर्वाधिक विकासकामे पुर्ण करणारा पक्ष ठरला आहे असेही यावेळी मुस्ताक म्हणाले. 
मोहोळ शहराच्या विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करत आहेत. दर्जेदार विकासकामे केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये विकासाबद्दल एक आश्वासक चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत नक्कीच मोहोळ शहरातील सुजाण मतदार बांधव राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक पसंती देतील अशी खात्री यावेळी खवळेनी आणि शेख या दोन्ही नगरसेवकांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ शहराच्या सर्वांगीण हितासाठी माजी आमदार राजन पाटील युवा नेते बाळराजे पाटील युवा नेते अजिंक्यराणा पाटील हो शहराचे ज्येष्ठ नेते शहाजान शेख यांनी सातत्याने अत्यंत सकारात्मक भावनेने प्रयत्न केले आहेत. मोहोळ ग्रामपंचायतीच्या कालावधीपासून ते नगरपरिषद स्थापनेपासून सात वर्षाच्या कालावधीत मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीमध्ये माजी आमदार राजन पाटील आणि पाटील परिवाराचे योगदान निश्‍चितपणे मोठे आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच्या रोमहर्षक विजयानंतर आमदारकीची धुरा स्वीकारल्यापासून दक्ष आमदार यशवंततात्या माने यांनी मोहोळ नगर परिषदेच्या माध्यमातून मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मोहोळ शहराच्या अनेक वर्षापासूनचे विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे मोहोळ शहराच्या यापुढील काळातील विकासाची धुरा देखील शहरातील मतदार विकासाभिमुख पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीकडेच ठेवतील असा आम्हाला विश्वास वाटतो

मुस्ताक शेख 
मा.नगरसेवक
राष्ट्रवादी 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages